गोंदिया कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:27 PM2019-02-23T23:27:42+5:302019-02-23T23:28:47+5:30

शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली.

Gondia cracked off | गोंदिया कडकडीत बंद

गोंदिया कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देहिंदू देवीची विटंबना प्रकरण : मोटारसायकल रॅली काढून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. त्यामुळे गोंदिया शहराचे वातावरण तापले असून या प्रकाराच्या निषेर्धात आज (दि.२३) कडकडीत बंद ठेवण्यात आला.
हिंदू धर्मियांच्या धार्मीक भावना दुखावणाऱ्या त्या समाजातील १६ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकावर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने हसी के रसगुल्ले या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर ती चित्रफीत टाकताच सिव्हील लाईनच्या रविशंकर वॉर्डातील निखिल मधुकर चंदनकर (२६) या तरूणाने आक्षेप घेत रामनगर पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरूध्द तक्रार करण्यात आली. रामनगर पोलिसांनी त्या विधीसंघर्षीत बालकावर १५३ अ २९५ अ सहकलम ६७, ६७ अ माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तो इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसला आहे. त्याच्याकडे ही अश्लील चित्रफीत कुठून आल्याची चौकशी रामनगर पोलिसांनी त्याच्या पालकांच्या समोर केली. कुठूनतरी आलेल्या लिंकला डाऊनलोड केल्यामुळे ती चित्रफीत त्याला मिळाल्याचे त्याने सांगितले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हे कृत्य हेतूपुरस्सर रित्या करण्यात आले असून हिंदू बांधवांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे कृत्य यापुढे होऊ नये यासाठी गोंदिया शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते.
या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे नागरिकांची अडचणही झाली. कापड दुकाने, किराणा दुकान, दागिण्यांची दुकाने असे सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता.
शेकडो तरुणांनी काढली बाईक रॅली
पुलवामा घटनेच्या जखमा भरत नाही तोच पुन्हा गोंदियात हिंदूच्या अस्मीतेवर आघात करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा मॅसेज गोंदियाच्या विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरला.त्यातून स्वयंस्फूर्तीने शेकडो तरूणांनी २३ फेब्रुवारीला गोंदिया बंदला प्रतिसाद देत गोंदिया शहरातून मोटारसायकल रॅली काढली. भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली.

Web Title: Gondia cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप