गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक लाच स्विकारताना अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 10:44 PM2021-10-13T22:44:33+5:302021-10-13T22:45:04+5:30

Gondia News गोंदिया जिल्हाधिकारी यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक व दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश अच्युत्तन मेमन यांना आज 13 ऑक्टोबरला सायकांळी 6 वाजेच्या सुमारास 10 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Gondia District Collector's personal assistant was caught accepting bribe | गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक लाच स्विकारताना अडकला

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक लाच स्विकारताना अडकला

Next

गोंदिया: गोंदिया जिल्हाधिकारी यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक व दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश अच्युत्तन मेमन यांना आज 13 ऑक्टोबरला सायकांळी 6 वाजेच्या सुमारास 10 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Gondia District Collector's personal assistant was caught accepting bribe)

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतंची ही पहिलीच घटना होय. तक्रारदाराचे हार्डवेयर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नुतनीकरण व हस्तातंरण करण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु मेमन यांनी याकरीता 10 हजाराची मागणी केली होती.काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चालान पावती जमा केली होती.

  परवाना हस्तांतरणकरीता विचारपूस करायला गेले असता मेमन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी  13 ऑक्टोबरला लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वातील त्यांच्या चमूने केली.

विशेष म्हणजे गेल्या 6 ऑक्टोबर व आज 13 ऑक्टोबरच्या अंकात बेरार टाईम्सने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात गेल्या 10-15 वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेले कर्मचारी ठाण मांडून असल्याचे नावासह प्रकाशित केले होते. त्या यादीत राजेश मेमन यांचे नाव सुध्दा होते. ते देवरी तहसिल कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून प्रतिनियुक्तीवर गेल्या 10-15 वर्षापासून काम करीत आहेत. असे अनेक कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. एकाच जागेवर अधिक काळ राहिल्यास त्या पदाचा कसा प्रकारे गैरवापर होऊ शकतो याचे उदाहरण आजची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाईच म्हणावी लागले. आत्ता तरी जिल्हाधिकारी महोदया प्रतिनियुक्तीवर गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्यांना पुर्वीच्या ठिकाणी हलवणार की त्यांच्यावरच विश्वास ठेवणार याकडे जनतेसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचेही लक्ष लागले आहे.

Web Title: Gondia District Collector's personal assistant was caught accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.