विदर्भात गोंदियाच ‘व्हेरी हॉट’, सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सीअस
By अंकुश गुंडावार | Published: April 22, 2023 03:35 PM2023-04-22T15:35:48+5:302023-04-22T15:36:16+5:30
ढगाळ वातावरण व गार वाऱ्याने पारा घसरला
गोंदिया : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्यानंतर हवामान खात्याने आता थेट बुधवारपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. अशात अधुनमधून दाटून येणारे ढग व गार वाऱ्यामुळे पारा घसरला असून शनिवारी (दि.२२) तापमान ३९.५ अंशावर आले होते. मात्र तरिही विदर्भात गोंदियाचेच तापमान सर्वाधिक असल्याने गोंदियाच ‘हॉट’ होता.
एप्रिल महिन्यातही जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ सुरूच असून गेली चार-पाच दिवस मात्र चांगलेच तापले. या काळात २० एप्रिल रोजी यंदाच्या सर्वाधिक ४३.५ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली असून त्यानंतर तापमान ४१ अंशावर राहिले आहे. अशातच गुरूवारी अचानकच सायंकाळी पावसाने हजेरी लावली व वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर हवामान खात्याने आता थेट बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देत जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे मधामधात ढग दाटून येत आहे. तर गार वारा वाहत असल्यामुळे पारा घसरला असून शनिवारी (दि.२२) कमाल तपमान ३९.५ अंशावर आले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तापमानाच्या तुलनेत गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वाधिक ‘हॉट’ होता.