वन्यजीवसृष्टीच्या संरक्षणात गोंदिया जिल्हा आघाडीवर
By admin | Published: October 9, 2016 12:49 AM2016-10-09T00:49:25+5:302016-10-09T00:49:25+5:30
गोंदिया जिल्हा वनराई व वन्यजीवसृष्टीने समृध्द आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आहे.
जिल्हाधिकारी काळे : वन्यजीव सप्ताहाचा समारोप
गोंदिया : गोंदिया जिल्हा वनराई व वन्यजीवसृष्टीने समृध्द आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आहे. त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाचे चांगले काम वन्यजीव, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरु आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी काढले.
१ ते ७ आॅक्टोबरदरम्यानच्या आयोजित वन्यजीव सप्ताहाचा समारोप शुक्रवारी येथील प्रताप लॉनमध्ये करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ होते. या मंचावर विशेष अतिथी म्हणून नवेगाव-नागझरिा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन यांची उपस्थिती होती.
यावेळी आतेगाव येथील इको डेव्हलपमेन्ट समितीला वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल एक लक्ष रु पयांचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मनीराम कळपते, उपाध्यक्ष सविता हरीणखेडे, कोषाध्यक्ष संजय हटवार, सचिव हटवार व सदस्य वसंत हटवार, मंगला कळपते, दयावंत मानकर, आनंदराव कोराम, रंजित कळपते जिल्हाधिकाऱ्याांच्या हस्ते देण्यात आला. गोंदिया येथील मंगलम मुकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर पथनाट्य सादर केले. झाडीपट्टीची लोककला असलेली दंडार तिरोडा तालुक्यातील गांगला येथील ग्रुपने सादर केली. कलावंत जीवन लंजे यांनी तुमडी गीत सादर केले. कार्यक्रमासाठी सातपुडा फांऊडेशनचे मुकुंद धुर्वे, सलीमकुमार धुर्वे, जीवराज सलाम, हिरवळ संस्थेचे रुपेश निबांर्ते, त्र्यंबक जरोदे, डब्लूसीटीचे अंकुर काळी, न्यूज संस्थेचे खोडे, गोंदिया निसर्ग मंडळाचे संजय आकरे, अशोक पडोळे, नागझिरा फाऊंडेशनचे सुनिल धोटे, सेवा संस्थेचे सावन बहेकार, भरत जसानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्र माला साकेत पब्लीक स्कुल गोंदिया, सेंट झेवियर हायस्कुल गोंदिया, नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी व राजस्थान कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विभागीय वनअधिकारी एस.एस.कातोरे, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक बिसेन, शेन्डे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल तसेच वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन आनंद मेश्राम व मुकुंद धुर्वे यांनी केले. आभार लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
- विविध स्पर्धेतील विद्यार्थ्याना बक्षीस
यावेळी चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रूची कापसे (प्रथम)- साकेत पब्लिक स्कुल गोंदिया, गुरु प्रित ठकरानी (द्वितीय)- विवेक मंदीर गोंदिया, नवनीत प्राशर (तृतीय)- निर्मल इंग्लिश स्कुल गोंदिया. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम- गुजराती नॅशनल हायस्कुल गोंदिया, द्वितीय- मनोहर मुन्सिपल हायस्कूल गोंदिया, तृतीय- साकेत पब्लीक स्कुल गोंदिया.
गोंदिया निसर्ग मंडळाने आयोजित केलेल्या कोलाज चित्रकला स्पर्धेत प्रथम- हितेश यादव, द्वितीय- भाविका करंजेकर, तृतीय- हुमीरा कच्छी व साक्षी नंदेश्ेवर. साकोली येथील एम.बी.पटेल कॉलेजने आयोजित केलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेत प्रथम- रोहिणी बोरकर व प्रियंका अमृतवार, द्वितीय-हुमेरा सैय्यद व नेहा हटवार, तृतीय- तेजस्वीनी मारवाडे व तेजिस्वनी बोरकर यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देण्यात आले.
वन्यजीव संरक्षण कार्यक्रम वर्षभर राबवावे
अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, १ जुलै रोजी जिल्हयात २ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेला नागरिकांनी मोठे सहकार्य करून वृक्ष लागवड केली. वन्यजीव सप्ताहात देखील विविध प्रकारचे चांगले कार्यक्रेम आयोजित करण्यात आले. वन्यजीव सप्ताह हा केवळ सात दिवसापुरता मर्यादीत न राहता वर्षभर साजरा करु न लोकसहभागातून वन्यजीवांचे व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.