गोंदिया जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 02:46 PM2018-03-24T14:46:42+5:302018-03-24T14:46:42+5:30
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. हा भाग नवेगावबांध- नागझिरा अभयारण्याला लागून असून वन्यजीव व वनविभागाचे राखीव जंगल आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारा जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी शेख, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, वनरक्षक अरविंद बगडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबटचा पंचनामा करून वाहनचालकांकडून माहिती घेतली. या बिबट्याचे वय ३ वर्षांचे असून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तो ठार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.