गोंदिया जिल्ह्यात संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:34 PM2019-01-28T14:34:35+5:302019-01-28T14:35:45+5:30
सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदवला.
मोहगाव-तिल्ली येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. मागील सहा महिन्यांपासून पद रिक्त असताना प्रभारी मुख्याध्यापक एच.के.धपाडे यांची बदली करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापकाच्या बदली प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकºयांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्याथ्यार्ना बसवून शाळा उघडू देणार असा पवित्रा घेतला. आधी रिक्त पदे भरा नंतरच शिक्षकांची बदली करा अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत बदली आदेश रद्द होणार नाही व सहा महिन्यांपासून रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरले जाणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. शिक्षण विभाग एकीकडे जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा सामोर आला आहे. सरपंच अल्का पाथोडे, उपसरपंच दिगंबर कटरे, रेवालाल गौतम, सुकचारी रहांगडाले, लोकराम बोपचे, चुन्नीलाल गौतम, यादोराव बोपचे, विनोद पटले, खिलेश्वर बोपचे, ज्योती जगनित, मालीक गौतम, ब्रिजलाल पटले व गावकºयांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच ठाण मांडले आहे. शिक्षण विभाग यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे