गोंदिया जिल्ह्यात ३४ लाखांच्या कच्च्या लोखंडाची चोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:01 AM2019-09-06T11:01:26+5:302019-09-06T11:01:49+5:30
देवरी येथून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरगाव डेपो परिसरात देवरी पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) रात्री धाड टाकून कच्च्या लोखंडासह साडेचौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: देवरी येथून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरगाव डेपो परिसरात देवरी पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) रात्री धाड टाकून कच्च्या लोखंडासह साडेचौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध देवरी पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
देवरी पोलिसांना येथील एका ढाब्यावर काही ट्रक चालक हे कच्चे लोखंड उतरवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गोंदियाचे पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे व गोंदियाचे अप्पर पोलीस अदीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या पथकाने ही धाड टाकली. यात कमरुद्दीन शाह यांच्या मालकीच्या ढाब्याच्या मागील भागात मोहम्मद इलियास याबूब शहा या ट्रकचालकासोबत कच्च्या लोखंडाचा सौदा करताना पोलिसांनी काहीजणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूम ३४ लाखांचा माल पकडला आहे.