मनरेगाच्या अमलबजावणीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 09:51 PM2018-03-25T21:51:07+5:302018-03-25T21:51:07+5:30
नरेश रहिले।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम देण्यात गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात सर्वाधीक १ कोटी १६ लाख ३० हजार ४९९ मनुष्य दिवस कामे उपलब्ध करुन देण्यात यशस्वी ठरला आहे.
मनरेगातंर्गत मागेल त्याला काम या तत्वावर रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मनरेगातंर्गत अनेक कामे राबवून १ कोटी १६ लाख मनुष्य दिवस कामे मजुरांना उपलब्ध करुन देत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील ८८ लाख ८५ हजार २५७ कुटुंबानी मनरेगाच्या कामासाठी जॉबकार्ड तयार केले. यातील १६ लाख ३९ हजार २१९ कुटुंबाना ७ कोटी ६५ लाख ५६ हजार २६१ दिवस कामे उपलब्ध करुन दिली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ५८ हजार ९४५ कुटुंबाना १ कोटी १६ लाख ३० हजार ४९९ मनुष्य दिवस काम देण्यात आले. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे. या जिल्ह्यात ८९ हजार १२४ कुटुंबाना ६६ लाख ५१ हजार ४१५, तिसºया क्रमांकावर भंडारा जिल्हा असून १ लाख ९ हजार ९७८ कुटुंबाना ५० लाख २४ हजार ६७३ मनुष्य दिवस काम देण्यात आले. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात ४० हजार ३०४ कुटुंबाना २२ लाख २ हजार ४२८, चंद्रपूर जिल्ह्याच्या ९२ हजार २९७ कुटुंबाना ४४ लाख ९५ हजार ३३९, गडचिरोली जिल्ह्याच्या ८३ हजार २०५ कुटुंबांना ३६ लाख १४४ मनुष्य दिवस व वर्धा जिल्ह्याच्या २३ हजार ५७९ कुटुंबांना १४ लाख ११ हजार ७५८ मनुष्य दिवस काम उपलब्ध करण्यात आले. महिलांना कामे उपलब्ध करुन देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांवर ६१ टक्के महिला कार्यरत आहेत. जिल्ह्यात ७० लाख ९४ हजार ७७३ मनुष्य दिवस महिलांना काम देण्यात आले. यानंतर भंडारा जिल्ह्यात २९ लाख ५४ हजार १९३, चंद्रपूर जिल्ह्यात २३ लाख २७ हजार ६८३, गडचिरोली जिल्ह्यात १७ लाख ३२ हजार २६१, नागपूर जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार १९५ तर वर्धा जिल्ह्यात ४ लाख २१ हजार ६२८ मनुष्य दिवस काम देण्यात आले. जिल्ह्यात सध्या स्थितीत १ हजार ७४६ कामे सुरू आहेत. यातील १ हजार २४३ कामे ग्रामपंचायतीत तर ५०३ कामे यंत्रणा करीत आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यामातून सुरू असलेल्या कामांवर ७८ हजार ७३६ तर यंत्रणेच्या कामांवर २९ हजार १९१ मजूर कामावर आहेत.
४१ हजार ५७५ कुटुंबांना शंभर दिवस काम
मनरेगा अंतर्गत कुटुंबाना शंभर दिवस काम देण्यातही गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ५७५ कुटुंबाना शंभर दिवस काम देण्यात आले. दुसºया क्रमांकावर अमरावती जिल्हा असून २० हजार २९० कुटुंबाना शंभर दिवस काम देण्यात आले.नागपूर विभागात चंद्रपुर जिल्ह्याने ९ हजार ७७७, गडचिरोली जिल्ह्यात ७ हजार २२३, नागपूर ६ हजार १९४, वर्धा जिल्ह्यात ३ हजार ७५५ कुटुंबाना शंभर दिवस काम देण्यात आले.
जिल्ह्यात देवरी तालुका आघाडीवर
जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये १ कोटी १६ लाख ३० हजार ४९९ मनुष्य दिवस काम देण्यात आले. यातील २२ लाख ३६ हजार ३०० मनुष्य दिवस काम देवरी तालुक्याने दिले असून १० हजार ६३ कुटुंबांना काम देण्यात आले. तर सर्वात मागे सडक-अर्जुनी आहे. या तालुक्यातील १८ हजार २३८ कुटुंबाना ९ लाख २३ हजार ९१४ मनुष्य दिवस काम उपलब्ध करण्यात आले. यातील २ हजार ३३० कुटुंबाना शंभर दिवस काम देण्यात आले.