शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 06:30 PM2022-01-27T18:30:00+5:302022-01-27T18:38:28+5:30
गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले.
गोंदिया : एकीकडे कोरोना हाहाकार माजवित आहे तेथेच दुसरीकडे थंडी आपला कहर करीत असून, दोघांच्या मधात माणसाची फसगत होताना दिसत आहे. तापमानाची घसरण काही थांबत नसून जिल्ह्यात शीतलहर आल्याने जिल्हावासियांना आता घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गुरुवारी (दि.२७) जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. यात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आहे.
मध्यंतरी थंडीने आपला जोर दाखवून दिला होता व तापमानात वाझ होऊ लागली होती. मात्र आता त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात होते. त्यानुसार पुन्हा तापमानात घसरण सुरू झाली असून, थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आहे. वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळत असून, त्यात आता या शीतलहरमुळे नागरिकांना आणखी त्रास होणार असे दिसून येत आहे.
२० डिसेंबर रोजी होते ८.२ अंश तापमान
गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले आहे, तर यंदा २० डिसेंबर रोजी जिल्ह्याचे सर्वांत कमी तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. यामुळे २० डिसेंबर हा दिवस यंदाचा सर्वांत थंड दिवस असल्याचे दिसून येत आहे.