गोंदिया निवडणूक निकाल; अपक्षाने रचला इतिहास; भाजपला केवळ एक जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 08:02 PM2019-10-24T20:02:59+5:302019-10-24T20:03:31+5:30
Maharashtra vidhan sabha election Results 2019; Gondia Election Results 2019; विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडून येत इतिहास रचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करुन जागा लढविल्याने जिल्ह्यातील चार पैकी तीन जागांवर वर्चस्व स्थापन करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.तर भाजपला चार पैकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
भाजपने निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आयारामांना संधी आणि केवळ विकासाच्या मुद्यावर दिलेला भर यामुळे मतदारांचे मन जिंकण्यात अपयश आले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या वेळी योग्य नियोजन करीत आणि मतांचे विभाजन टाळत चारपैकी तीन जागांवर विजय मिळवित भाजपचा गड भेदला. गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडून येत इतिहास रचला.
निवडणूक विश्लेषण
गोंदिया जिल्ह्यातील ४ पैकी भाजपला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. तब्बल १० वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचे खाते उघडण्यात यश.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गोपालदास अग्रवाल यांना तिकीट देणे भाजपला भोवले.भाजप बंडखोर उमेदवार विजयी.
आमगाव आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात शेवटपर्यंत काट्याची टक्कर.भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव.मनोहर चंद्रिकापुरेंनी रोखली बडोलेंची हॅट्रिक.
विजयी उमेदवारांची मते
विजय रहांगडाले- तिरोडा मतदारसंघ -भाजप-७५,७७३ मते
मनोहर चंद्रिकापुरे-अर्जुनीमोर मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस- ७२,४००
विनोद अग्रवाल- गोंदिया मतदारसंघ अपक्ष- १,०२,२०७
सहषराम कोरोटे- आमगाव मतदारसंघ- कांग्रेस-७१,११८