गोंदिया आगाराला ४० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:27 PM2017-11-14T23:27:23+5:302017-11-14T23:27:37+5:30

आॅक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या पर्वावरच एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Gondia fire: 40 lakhs fires | गोंदिया आगाराला ४० लाखांचा फटका

गोंदिया आगाराला ४० लाखांचा फटका

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांच्या संपाचाही परिणाम : आॅक्टोबरमध्ये दोन कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आॅक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या पर्वावरच एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे आॅक्टोबर महिन्यात गोंदिया आगाराचे ४० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती आहे.
यावर्षी आॅक्टोबर २०१७ मध्ये गोंदिया आगारातील बसेस ७ लाख ३७ हजार ७८८.४ किमी धावल्या. त्यातून आगाराला २ कोटी ६१ हजार ३५१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये गोंदिया आगारातील बसेस ८ लाख ३४ हजार ४०४.५ किमी धावल्या. त्यामुळे आगाराला १ कोटी ८१ लाख १५ हजार ३६० रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. विशेष म्हणजे यावर्षी आॅक्टोबर महिन्यात दिवाळी होती. या कालावधीत बाहेरगावी जाणाºया प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या कालावधीत आगाराला चांगले उत्पन्न मिळते. परंतू, यंदा याच कालावधीत एसटी कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून संप पुकारला. परिणामी गोंदिया व तिरोडा आगारातील सर्वच कर्मचारी संपावर असल्याने जिल्ह्यातील एसटीची सेवा ठप्प पडली होती. त्याचाच परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला. एरवी दरदिवशी गोंदिया आगाराला सहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र दिवाळीच्या कालावधीत दररोज १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत असते.
मात्र संपामुळे प्रतिदिवस ३० हजार किमीच्या बसफेºया झाल्या नाही. त्यामुळे १० लाख रूपये प्रतिदिवस याप्रमाणे ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. संप मागे घेतल्यानंतर २१ व २२ आॅक्टोबरला एसटीची वाहतूक सेवा पूर्णत: सुरळीत होवू शकली नाही.

बस सेवेवर विपरित परिणाम
महाराष्टÑ एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी कर व मोटार वाहन कर इतर राज्यापेक्षा महाराष्टÑ राज्यात सर्वाधिक आहे. गुजरात शासनाने प्रवासी कराचे दर कमी करून ते ७.५ टक्के केले आहे. महाराष्टÑातील साध्या बसवरील १७.५ टक्के प्रवासी करामुळे खासगी व अवैध वाहतुकीला तोंड देणे कठिण जात आहे. साधी, निमआराम व वातानुुकुलित व्होल्वो या तिन्ही प्रकारात महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे प्रती प्रवासी किमी मागील भाडे इतर महामंडळाच्या तुलनेत खूपच कमी आहे.त्याचा देखील एसटी महामंडळाला बसत आहे.

आॅक्टोबर महिन्यात दिवाळीदरम्यान चार दिवस चाललेल्या कामगारांच्या संपामुळे बस सेवा बंद होती व आगाराला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. संपाचा काळच अधिक उत्पन्नाचा काळ होता. परंतु बससेवा ठप्प पडल्याचे प्रतिदिवस १० लाख रूपयांचे नुकसान झाले.
जयकुमार इंगोले,
आगार व्यवस्थापक, गोंदिया.

Web Title: Gondia fire: 40 lakhs fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.