गोंदिया आगाराला दरमहा ३० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:37 AM2019-01-20T00:37:47+5:302019-01-20T00:38:43+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.

Gondia fire: Rs 30 lakh per month | गोंदिया आगाराला दरमहा ३० लाखांचा फटका

गोंदिया आगाराला दरमहा ३० लाखांचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देलागले रिक्तपदांचे ग्रहण : चालक व वाहकांची कमतरता

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी गोंदिया आगाराला दररोज सुमारे १ लाख रूपये म्हणजेच महिन्याकाठी ३० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
‘कशाला करता विषाची परीक्षा- एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण एसटीच्या प्रवासाला घेऊन चांगलीच प्रचलीत आहे. या म्हणीनुसारच बहुतांश प्रवासी एसटीनेच प्रवास करण्यात प्राथमिकता देतात. यामुळेच दुर्गम अशा गावांतही परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ मोठ्या दिखामात शिरून आपली सेवा देत आहे. एसटीच्या या सेवेला बघता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आर्थिक दृष्टया नफ्यात असणे अपेक्षीत आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रवासी वाहने त्यातच परिवहन महमंडळातीलच काही उणीवा महामंडळाला तोट्यात टाकत आहे.
यात गोंदिया आगाराची स्थिती बघता आगाराला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसत असून तेच आगाराच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार ठरत आहे. त्याचे असे की, ‘लालपरी’ची सेवा देणाºया चालक व वाहकांचे पद गोंदिया आगारात रिक्त पडून आहे. परिणामी आगाराला दिवसा १२ ते १३ बस फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यातून आगाराला दिवसा सुमारे १ लाख रूपयांचा म्हणजेच महिन्याकाठी ३० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत असल्याची माहिती आहे. चालक व वाहकांची कमी असल्याने आहे त्या चालक-वाहकांकडून ओव्हर टाईम करवून घ्यावे लागत आहे. मात्र तरिही बस फेºया रद्द कराव्या लागत असल्याने आगार आर्थिक नुकसानीत आहे.
विशेष म्हणजे, चालक व वाहकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावी यासाठी आगार व्यवस्थापकांकडून प्रयत्न केले जातात. मात्र वरिष्ठ अधिकारी पद भरतीचे अधिकार आपल्याकडे नसल्याने सांगत हात मोकळे करीत असल्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती आहे. मात्र याचा फटका आगार व महामंडळालाच बसत असल्याने रिक्त पदे भरल्यास गोंदिया आगाराच्या तिजोरीत नक्कीच भर पडणार आहे.
१८ चालक तर ३० वाहकांची पदे रिक्त
गोंदिया आगाराच्या आस्थापनेत १४४ चालक व तेवढीच वाहकांची पदे मंजूर आहेत. मात्र आजघडीला आगारात १२६ चालक व ११४ वाहक कार्यरत आहेत. म्हणजेच, चालकांची १८ पदे रिक्त असून वाहकांची ३० पदे रिक्त आहेत. याशिवाय मेक ॅनिकची ५३ पदे मंजूर असून सध्या ४३ मेकॅनिक कार्यरत आहेत.या शिवाय अन्य कर्मकारीही आहेत. आगारातून दिवसाला ४२२ फेºयांची ये-जा होते. मात्र चालक व वाहकांची कमी असल्याने दररोज १२ ते १३ फेºया रद्द कराव्या लागत आहेत.

Web Title: Gondia fire: Rs 30 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.