गोंदिया आगाराला दिवाळी चांगलीच पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:15 PM2018-11-26T22:15:54+5:302018-11-26T22:16:21+5:30

प्रवासी सुविधा हे ब्रिद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला यंदाची दिवाळी चांगलीच पावल्याचे दिसून येत आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळात गोंदिया आगाराला चक्क १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे.

Gondia got very good Diwali in Diwali | गोंदिया आगाराला दिवाळी चांगलीच पावली

गोंदिया आगाराला दिवाळी चांगलीच पावली

googlenewsNext
ठळक मुद्देआगाराला १.९२ कोटींचे उत्पन्न : २० दिवसांचा काळ भरभराटीचा

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रवासी सुविधा हे ब्रिद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला यंदाची दिवाळी चांगलीच पावल्याचे दिसून येत आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळात गोंदिया आगाराला चक्क १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, आगाराने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष फेऱ्यांचीही व्यवस्था केली होती व त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे हे फलीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल रंगाच्या एसटीसाठी पूर्ण विश्वासाने वापरली जाते. या म्हणीवरून नागरिकांचा एसटीवरील दृढ विश्वास छळकतो. म्हणीनुसारच अधिकाधिक नागरीक एसटीने प्रवास करतात. यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी अत्यंत महत्वाची ठरली आहे.
नागरिकांच्या एसटीवरील विश्वासामुळेच महामंडळाकडून प्रवासी सुविधा ब्रिद धरूनच अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज प्रवासाच्या सोयीत वाढ झालेली असतानाही लाल रंगाची एसटी तीच शान घेवून धावताना दिसते.
विशेष म्हणजे, एसटी वरील प्रवाशांचा विश्वास व त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांचे फलीतही मिळत असून याचे मुर्त उदाहरण गोंदिया आगाराने दाखवून दिले आहे.
यंदाची दिवाळी गोंदिया आगाराला चांगलीच भरभराटीची ठरली असून दिवाळीच्या काळात आगाराने १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ४ ते २३ नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळातील उत्पन्नाचा हा आकडा आहे.
विशेष म्हणजे, आगाराने दिवाळीच्या सुट्या बघता प्रवाशांच्या सुविधेसाठी बसफेºया वाढवून दिल्या होत्या. त्यामुळे अन्य दिवसांत १७-१८ हजार असलेली प्रवासी संख्या २०-२२ हजारांवर पोहचली होती. मात्र आता दिवाळीचा काळ संपल्याने २४ तारखेपासून या वाढीव बसफेºया बंद करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांनीही त्यांना दिलेल्या सुविधांचा मोबदला १ कोटी ९२ लाख १६ हजार रूपयांच्या उत्पन्नातून आगाराला दिला असल्याचे दिसते.
खासगी प्रवासी वाहन एसटीच्या मानगुटीवर
एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखकर असतानाच खासगी प्रवासी वाहन मात्र आता एसटीच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे. आजघडीला एसटी बसेसच्या तुलनेत खाजगी बसेस, आॅटो व काळीपिवळींची संख्या वाढली आहे. खाजगी प्रवासी वाहनचालक प्रवासी मिळविण्यासाठी एसटीच्या वेळेपुर्वी पोहचतात. तसेच पाहिजे तेवढ्या फेऱ्या ते मारू शकतात. मात्र एसटीला नियमांत राहून धावावे लागत असल्याने खासगी प्रवासी वाहनांत बसून प्रवासी निघून जातात. याचा फटका महामंडळाला बसत आहे.

Web Title: Gondia got very good Diwali in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.