Gondia: स्थायी समितीच्या सभेतील प्रकार : जि.प.सभापतीची शिक्षणाधिकाऱ्याला शिविगाळ

By अंकुश गुंडावार | Published: July 26, 2023 05:01 PM2023-07-26T17:01:03+5:302023-07-26T17:01:37+5:30

Gondia: कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रुपेश कुथे यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सांगितलेेले काम करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांना शिविगाळ करीत बैठक सोडून निघून गेल्याचे प्रकार घडल्याची माहिती आहे.

Gondia: Incident in the Standing Committee meeting: J.P. Chairman abuses Education Officer | Gondia: स्थायी समितीच्या सभेतील प्रकार : जि.प.सभापतीची शिक्षणाधिकाऱ्याला शिविगाळ

Gondia: स्थायी समितीच्या सभेतील प्रकार : जि.प.सभापतीची शिक्षणाधिकाऱ्याला शिविगाळ

googlenewsNext

गोंदिया - जि.प.च्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी(दि.२६) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रुपेश कुथे यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सांगितलेेले काम करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांना शिविगाळ करीत बैठक सोडून निघून गेल्याचे प्रकार घडल्याची माहिती आहे.

जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि.२६) आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होता कृषी सभापती कुथे यांनी आंतरजिल्हा बदलीत बदलून आलेल्या शिक्षकाचे काम न झाल्याने आक्रमक झाले. तसेच आम्ही सांगितलेले काम व ते काम करा असे जि.प. अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही होत नसल्याचे एकेरी अश्ल्लील शब्दात आवेशात येत बोलताच सभागृहात शांतता पसरली. विशेष म्हणजे सभेचे अध्यक्ष असलेले जि.प.अध्यक्ष रहागंडालेनी सुध्दा सभापती कुथे यांना सांभाळून घेत शांत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत गप्प राहून काही वेळांनी सभा संपवले. तर विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे सदस्यही गप्पच राहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर अधिकारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले असून भविष्यातील सभामध्ये जायचे की नाही यावर चर्चा करु लागलेत.

Web Title: Gondia: Incident in the Standing Committee meeting: J.P. Chairman abuses Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.