सलग दुसऱ्या दिवशीही गोंदिया ‘कूल’

By कपिल केकत | Published: December 11, 2023 07:38 PM2023-12-11T19:38:23+5:302023-12-11T19:39:26+5:30

विदर्भात पहिल्याच क्रमांकावर : कमाल २६.९, तर किमान १३.० अंश सेल्सिअस तापमान

Gondia is cool for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशीही गोंदिया ‘कूल’

सलग दुसऱ्या दिवशीही गोंदिया ‘कूल’

गोंदिया : पावसाने उघडीप दिल्यानंतर आता थंडीचा जोर वाढत असून, रविवारी (दि.१०) गोंदिया जिल्हा विदर्भात प्रथम क्रमांकावर असतानाच सोमवारीही (दि.११) जिल्ह्याचे कमाल व किमान तापमान विदर्भात सर्वांत कमी होते. यामुळे सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही गोंदियाच विदर्भात सर्वात ‘कूल’ ठरला.

जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण पार ढवळून निघाले आहे. अवकाळी बरसत असताना थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. थंडीपासून बचावासाठी सकाळपासूनच गरम कपडे व शेकोटीचा आधार घ्यावा लागला होता. सोमवार ते बुधवारपर्यंत पावसाने संततधारच लावली होती व हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव आला होता. 

गुरुवारपासून (दि.७) पावसाने उघडीप दिली व ढगाळ वातावरणही स्वच्छ झाले. यानंतर मात्र थंडीचा जोर आणखी वाढणार असा अंदाज होताच. त्यानुसार, पारा आणखी घसरला व थंडीचा जोर वाढू लागला आहे. रविवारी (दि.१०) रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंशावर आले होते, तर किमान तापमान १२.६ अंशावर घसरले होते. यामुळे गोंदिया जिल्हा विदर्भात प्रथम क्रमांकावर होता. तर सोमवारी (दि.११) कमाल तापमान २६.९ अंशावर व किमान तापमान १३ अंशावर आल्यानंतरही गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या दिवशीही प्रथम क्रमांकावरच होता.

लहान मुले व वृद्धांना जपा

- थंडीचा जोर वाढत असून युवांना थंडीपासून जास्त त्रास होत नसून उलट ते थंडीचा आनंद घेतात. मात्र, थंडीचा त्रास लहान मुले व वृद्धांना होताना दिसून येतो. विशेष म्हणजे, पावसाने पाय काढून घेतला असला तरी मधामधात ढगाळ वातावरण तयार होत आहे. आरोग्यासाठी हाच प्रकार धोक्याचा राहत असल्याने लहान मुले व वृद्धांना जपण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

विदर्भात प्रथम पाच शहरांतील तापमान

गोंदिया- १३.०

चंद्रपूर- १३.२

वाशिम- १३.६

नागपूर- १३.८

अमरावती- १४.२

Web Title: Gondia is cool for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.