Gondia: माताटोलीच्या पंचशिल चौकातून २:११ लाखांचे दागिने चोरले, गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: November 1, 2023 07:28 PM2023-11-01T19:28:40+5:302023-11-01T19:28:53+5:30

Gondia News: नागपूर येथील मुलीच्या घरी ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गोंदियातील शेख कुटुंबियांच्या घरून २ लाख ११ हजार रूपयाचे दागिणे पळविण्यात आले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

Gondia: Jewelery worth Rs 2:11 lakh stolen from Panchshil Chowk, Matatoli | Gondia: माताटोलीच्या पंचशिल चौकातून २:११ लाखांचे दागिने चोरले, गुन्हा दाखल

Gondia: माताटोलीच्या पंचशिल चौकातून २:११ लाखांचे दागिने चोरले, गुन्हा दाखल

- नरेश रहिले
गोंदिया - नागपूर येथील मुलीच्या घरी ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गोंदियातील शेख कुटुंबियांच्या घरून २ लाख ११ हजार रूपयाचे दागिणे पळविण्यात आले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

गोंदियाच्या पंचशिल चौक माताटोली येथील बेगम खुर्शीदो नासीर शेख (६२) ह्या आपल्या मतीसाेबत २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मुलीच्या घरी नागपूर येथे ग्यारवीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरी परतल्यावर त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दाराचा कोंडा तोडून ३५ हजार रोख रकमेसह २ लाख १० हजार ८९० रूपयाचे दागिणे पळवून नेले असल्याचे पुढे आले. अज्ञात चोरट्यांनी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील हे दागिणे चोरून नेले. बेगम खुर्शीदो नासिर शेख (६२) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

हे दागिणे पळविले
६ ग्रॅम वजनाची एक सोन्याची आंगठीकिंमत २१ हजार, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गळ्यातील हार किंमत ३५ हजार, ६० ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पायपट्या १८०० रूपये, २ ग्रॅम वजनाची चांदीचे बिछवे किंमत ९० रूपये, १० ग्रॅम वजनाचे दोन कानातील झाले किंमत ३५ हजार, ३ ग्रॅम वजनाची एक सोन्याची नथ कुंमत १० हजार ५०० रूपये, ५ ग्रॅम वजनाचे दोन कानातील झाले किंमत १७ हजार ५०० रूपये, ५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची आंगठी किंमत १७ हजार ५०० रूपये, दोन मोबाईल किंमत १ हजार, मातीच्या गल्ल्यातील १५०० रूपये व ३५ हजार रूपये रोख असा ऐवज पळविला.

Web Title: Gondia: Jewelery worth Rs 2:11 lakh stolen from Panchshil Chowk, Matatoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.