Gondia: बंद घर हेरले, चोरट्यांनी संधी साधली, १.५७ लाखांचा ऐवज लंपास
By कपिल केकत | Updated: November 16, 2023 16:22 IST2023-11-16T16:22:29+5:302023-11-16T16:22:46+5:30
Theft: घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातून दागिने व रोख असा एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रिंग रोड लोहिया वॉर्ड येथे १४ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही घटना घडली.

Gondia: बंद घर हेरले, चोरट्यांनी संधी साधली, १.५७ लाखांचा ऐवज लंपास
- कपिल केकत
गोंदिया - घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातून दागिने व रोख असा एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रिंग रोड लोहिया वॉर्ड येथे १४ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी योगेश चंद्रकांत ढोमणे (४१, रा. रिंग रोड लोहिया वॉर्ड) हे पत्नी व मुलासोबत सासरी गेले होते. तर त्यांची आई कुडवा येथील मोठ्या मुलाकडे गेली असल्याने घर बंद होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून आलमारीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र किंमत ६० हजार रुपये, सोन्याचे कानातील झुमके किंमत १२ हजार रुपये, सोन्याचे कानातील टाप्स किंमत सहा हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या किंमत तीन हजार रुपये, सोन्याचा कडा किंमत एक हजार ५०० रुपये, चांदीची वाटी, चमचा, दोन कडे, ब्रेसलेट, जोडवे, सिक्के, कमरेचा आकडा, करडा, चाळ किंमत १५ हजार रुपये व रोख तीन हजार रुपये तसेच आईच्या आलमारीतून रोख १० हजार रुपये असा एकूण एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.