तिरोडा मुख्याधिकाऱ्यांकडे गोंदिया न.प.चा प्रभार

By admin | Published: June 21, 2015 01:04 AM2015-06-21T01:04:34+5:302015-06-21T01:04:34+5:30

गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे.

Gondia NP Charge to Tiroda Chief Officer | तिरोडा मुख्याधिकाऱ्यांकडे गोंदिया न.प.चा प्रभार

तिरोडा मुख्याधिकाऱ्यांकडे गोंदिया न.प.चा प्रभार

Next

शुक्रवारीपासून काम सुरू : ठरावीक दिवस नाही
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे. प्रभार देण्यात आला असला तरिही येथील कामकाजावर मात्र प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे. कारण प्रभारी मुख्याधिकारी आपल्या सवडीनुसार गोंदिया कार्यालयात येणार असल्याचे कळले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांची कामे रेंगाळणार यात शंका नाही.
मुख्याधिकारी मोरे व नगरसेवक शिव शर्मा यांच्यातील वादाने काही दिवस नगर परिषद कार्यालयाचा कारभार बंदच होता. त्यानंतर लगेच नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांच्या हत्येनंतर सफाई कामगारांनी नगर परिषदेत तोडफोड केली. त्यामुळे नगर परिषद बंद ठेवण्यात आली होती. हे सर्व प्रकार सुरूच असताना १५ जून पासून मुख्याधिकारी मोरे रजेवर गेले. विशेष म्हणजे त्यांनी रजेचा कालावधी दशर्विलेला नसल्याचे कळले. त्यात पालिकेचा प्रभार गुरूवार (दि.१८) पर्यंत कुणाकडेही देण्यात आलेला नव्हता. शुक्रवारी (दि.१९) प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळले.
उरकुडे यांच्याकडे गोंदिया नगर परिषदेचा प्रभार देण्यात आलेला असतानाही येथील कारभार मात्र प्रभावीत झाल्याचेच दिसते. कारण येथील कर्मचारी साहेब नसल्याने आमच्याकडे अधिकार नाही असे कारण पुढे करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रभारी मुख्याधिकारी उरकुडे सुद्धा कार्यालयात हजर राहणार नाहीत. अशात कर्मचारी त्यांचे कारण पुढे करून हात मोकळे करून घेणार. एकंदर याचा परिणाम कामकाजावर होणार असून नागरिकांची कामे मात्र खोळंबणार यात शँका नाही.
तरीही गोंदियावासीयांची कामे खोळंबणार
प्रभारी मुख्याधिकारी उरकुडे यांना तिरोडा नगर परिषदेचा कारभार बघून गोंदियाचाही कारभार बघावा लागणार आहे. असे असताना त्यांनी गोंदिया कार्यालयासाठी ठराविक दिवस दिला नाही. शिवाय शुक्रवारी ते गोंदिया कार्यालयात दोन तास बसले होते असे कळले. अशात त्यांच्या अनुपस्थितीत मात्र नागरिकांची कामे खोळंबणार यात शंका नाही. शिवाय मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीही मनमर्जीने कारभार करणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
बहुतांश कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी
येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पालिकेतील बहुतांश क र्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. अगोदरच बिएलओचे काम देण्यात आलेले असताना आता इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीही दिसून आली. मात्र उपाय नसल्याने कर्मचारी मनमारून कामे करीत आहेत. इलेक्शनच्या या ड्युटीमुळे मात्र कर्मचारी जागेवर उपलब्ध राहत नाहीत. त्याचाही परिणाम कामकाजावर पडत असून नागरिकांची कामे खोळंबतात.

Web Title: Gondia NP Charge to Tiroda Chief Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.