Gondia: गहाळ झालेले ८८ मोबाईल शोधून पोलिसांनी दिले तक्रारकर्त्यांना, पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मोबाईल धारकास वाटप
By नरेश रहिले | Published: June 17, 2023 06:28 PM2023-06-17T18:28:48+5:302023-06-17T18:29:16+5:30
Gondia: हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या.
- नरेश रहिले
गोंदिया: हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. परिणामी गोंदिया शहर पोलिसांनी ते गहाळ झालेले मोबाईल विविध ठिकाणातून शोधून मूळ मालकाला दिले. गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतून पळविण्यात आलेले ८० मोबाईल हे तक्रारकर्त्याला परत करण्यात आले.
सन २०२१ पासून २०२३ या तीन वर्षात गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईल संदर्भात तक्रार गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी तांत्रीक मदतीने तपास कररून विविध कंपन्यांचे ८८ मोबाईल अत्यंत महागडे शोधून ते तक्रारकर्त्यांना परत करण्यात आले. १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रारकर्त्यांना बोलावून पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ते मोबाईल तक्रारकर्त्यांना परत केले.
हे मोबाईल शोधण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, अरविंद राऊत, विजय गराड, रामभाऊ होंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद शैदाने, सहाय्यक फौजदार जागेश्वर उईके, घनश्याम थेर, महिला पोलीस हवालदार रिना चव्हाण, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, संतोष भांडारकर, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, दीपक रहांगडाले, पुरूषोत्तम देशमुख, विक्की पराते, करण बारेवार, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, सायबरसेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीद, पोलीस हवालदार दिक्षीत दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, घनश्याम शेंडे, संजय महारवाडे यांनी मोहीम राबविली होती. गोंदिया जिल्हाभरातील तरूण-तरूणींचे मोबाईल गोंदिया शहरातून पळवून नेले होते.