गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 AM2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:16+5:30

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, घरफोडी, मारामारी व घातपात असे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गोंदिया पोलीस कमालीची कसरत करीत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदियाची कारवाई सामान्य आहे. परंतु गडचिरोली रेंजमधील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदिया गुन्हे उघडकीस आणण्यात आघाडीवर आहे. ७६ टक्के गुन्हे गोंदिया पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

Gondia police is very active in matching criminals' horoscopes! | गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव!

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव!

Next

नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलिसांचे कामकाज सुसह्य होण्यासाठी विकसित केलेल्या सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) या प्रणालीमध्ये गोंदिया पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत गोंदियाने गडचिरोलीला मागे टाकले आहे. डिसेंबर महिन्यात गोंदिया जिल्हाभरात ८२६ गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, घरफोडी, मारामारी व घातपात असे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गोंदिया पोलीस कमालीची कसरत करीत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदियाची कारवाई सामान्य आहे. परंतु गडचिरोली रेंजमधील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदिया गुन्हे उघडकीस आणण्यात आघाडीवर आहे. ७६ टक्के गुन्हे गोंदिया पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
- सीसीटीएनएस प्रणालीत देशभरातील सर्व ठाण्यांत दाखल होणारे गुन्हे, तपास व तत्सम अभिलेख्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. 
- ऑनलाइन तक्रारींचा निपटारा, दाखल गुन्हे, तपास, दोषारोपपत्र अशी एकूण १८ प्रकारची माहिती सीसीटीएनएसमध्ये अपलोड करावी लागते. 
- प्रत्येक महिन्याला या कामकाजाचे राज्यात गुन्हे अन्वेषण विभागामार्फत मूल्यांकन केले जाते.
- मूल्यांकनानुसार कोणत्या जिल्ह्याने किती गुण घेतले याचा एक रिपोर्ट तयार केला जातो.

गुणांकनात १७२ पैकी १३०  गुण

डिसेंबर २०२१ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत गोंदिया जिल्हा पोलीस दलाने १७२ पैकी १३० गुण घेऊन आपली कामगिरी बऱ्यापैकी आहे असा संदेश दिला.
गोंदियापेक्षा गडिचरोली १० गुण कमी घेऊन गोंदियाच्या मागे राहिला आहे. गडचिरोलीला १२० गुण मिळाले आहेत.

वर्षभरात हजारो गुन्ह्यांची ऑनलाईन नोंद

- गोंदिया जिल्ह्यातील सर्व गुन्ह्याची ऑनलाईन नोंदणी केली जाते. जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांत दाखल होणाऱ्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने एफआयआर केली जाते. जिल्ह्यातील  हजारो तक्रारी वर्षभरात नोंदविण्यात आल्या आहेत.

सायबर सेलची मिळते चांगली मदत
- सीसीटीएनएसच्या नोंदीसोबत ऑनलाइन तक्रारींचा निपटारा, गुन्हे तपास व प्रतिबंध यासाठी अधिकाधिक काम केले. नियमित आढावा घेतला. सीसीटीएनएसच्या अंमलदारांनीही परिश्रम घेतले. कोणत्याही तपासात सायबर सेलची चांगली मदत मिळते.

 

Web Title: Gondia police is very active in matching criminals' horoscopes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस