राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गोंदियातील शिक्षक सन्मानित
By admin | Published: October 13, 2016 01:57 AM2016-10-13T01:57:15+5:302016-10-13T01:57:15+5:30
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१५-१६ वितरण कार्यक्रम नॅशनल सेंटर
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१५-१६ वितरण कार्यक्रम नॅशनल सेंटर परफार्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मार्ग नरिमन पॉर्इंट, मुंबई येथे पार पडला. यात गोंदियातील तीन शिक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी जीईएस हायस्कूल दासगाव येथील सहायक शिक्षक सुनील ओमकारप्रसाद श्रीवास्तव तसेच प्राजक्ता रणदिवे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य अॅड. राजपुरोहित, विधान परिषद सदस्य अॅड. राहुल नार्वेकर, महापौर स्रेहल आंबेकर, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) नामदेव जरग, शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे, उद्योग व खनिज मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
सालेकसा तालुक्यातील बाकलसर्रा येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधूरकुमार शोभेलाल नागपुरे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख १० हजार रूपयांचा धनादेश देवून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पी.के. गिरी, बी.पी. पटले, लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांनी कौतुक केले.