गोंदिया-तिरोड्यात प्रभागरचना व नवीन आरक्षणाला मंजुरी

By admin | Published: August 21, 2016 12:08 AM2016-08-21T00:08:12+5:302016-08-21T00:08:12+5:30

नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांना घेऊन प्रभागरचना व आरक्षणावरील आक्षेपांची सुनावणी झाली.

Gondia-Tirodi sanctification and new reservation | गोंदिया-तिरोड्यात प्रभागरचना व नवीन आरक्षणाला मंजुरी

गोंदिया-तिरोड्यात प्रभागरचना व नवीन आरक्षणाला मंजुरी

Next

गोंदियात ३५ तर तिरोडात ७ आक्षेप : काही प्रभागांचे क्रमांक बदलले
गोंदिया : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांना घेऊन प्रभागरचना व आरक्षणावरील आक्षेपांची सुनावणी झाली. अंतिम प्रभागरचना व आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या आक्षेपांमुळे गोंदिया व तिरोडा या दोन्ही नगर परिषदांतील काही प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले असल्याचे दिसले.
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषदांची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपत आहे. त्यामुळे सन २०११ च्या जनगणनेच्या आधारावर प्रभागरचना व आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यानुसार गोंदिया शहरात २१ प्रभागांसाठी ४२ तर तिरोडा ८ प्रभागांसाठी १७ सदस्यसंख्या निश्चीत करण्यात आली. मात्र प्रभागरचना व आरक्षणाघेऊन गोंदियातून ३५ तर तिरोडातून ७ आक्षेप घेण्यात आले.
यात विभागीय आयुक्तांनी गोंदियातील १० व तिरोडातील ६ आक्षेप स्वीकारून त्यानुसार दुरूस्ती करण्यात आली व उर्वरीत अमान्य केले. तसेच १० आॅगस्ट रोजी प्रभागरचना व आरक्षणाला अंतिम मंजूरी दिली आहे. दोन्ही नगर परिषदांना सार्वत्रिक निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुकाकडून तयारी जोरात सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gondia-Tirodi sanctification and new reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.