रोहयोच्या कामात विभागात गोंदिया पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 01:55 AM2016-04-06T01:55:29+5:302016-04-06T01:55:29+5:30
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे.
चंद्रपूर आघाडीवर : जिल्ह्यातील ५१.९६ टक्के काम अपूर्ण
गोंदिया : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे. गोंदिया जिल्ह्याची स्थिती या योजनेप्रती यावर्षी दयनिय आहे. जिल्ह्यात मनेरगा अंतर्गत करण्यात येणारे ५१.९६ टक्के काम अपूर्ण आहेत. या शिवाय चंद्रपुर जिल्ह्यात या योजनेतील कामांना उदंड प्रतिसाद असून तेथील फक्त २९.३३ टक्के काम अपूर्ण आहेत.
मनरेगा अंतर्गत सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २४ हजार ८७९ काम सुरू झाले. यातील ११ हजार ९५२ म्हणजे ४८.०४ टक्के कामे सुरू झाली असून १२ हजार ९२७ कामे म्हणजेच ५१.९६ टक्के कामे अपूर्ण आहेत. मनरेगाच्या कामात आघाडीवर असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात मागील तीन वर्षात २५ हजार ७४७ कामे सुरू झाली असून १८ हजार १३६ कामे म्हणजेच ७०.६७ टक्के काम पुर्णत्वास गेली आहेत. तर ७ हजार ५५१ म्हणजेच २९.३३ कामे अपुर्ण आहेत.
गोंदिया नंतर गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२ हजार ८१४ कामे सुरू झाली असून त्यात १५ हजार ९५८ म्हणजेच ४८.६३ टक्के कामे पूर्ण आहेत. तर १६ हजार ८५६ म्हणजेच ५१.३७ टक्के कामे अपूर्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरू झालेल्या २९ हजार २३३ कामांपैकी १८ हजार ६०६ म्हणजेच ६३.६५ कामे पुर्ण झाली आहेत. तर १० हजार ६२७ म्हणजेच ३६.३५ टक्के कामे अपुर्ण आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात २६ हजार २७८ कामे सुरू असून यातील १६ हजार ९८४ म्हणजेच ६४.६३ टक्के कामे पुर्ण झाली आहेत. तर ९ हजार २९४ कामे म्हणजेच ३५.६३ टक्के कामे अपुर्ण आहेत. वर्धा जिल्ह्यात ४६ हजार ३३१ कामे सुरू असून ३० हजार ४३५ म्हणजेच ६५.६९ कामे पुर्ण झाले आहेत. तर १५ हजार ८९६ म्हणजेच ३४.३१ टक्के कामे अपुर्ण आहेत. (तालुका प्रतिनिधी)