घरफोडून चांदीसह ऐवज चोरणारे दोघेजण जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई
By नरेश रहिले | Published: June 3, 2024 07:35 PM2024-06-03T19:35:08+5:302024-06-03T19:37:22+5:30
आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल गोंदिया पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गोंदिया: शहराच्या नाना चौक, कुंभारेनगर अमोलकुमार भिमराव गजभिये (४४) यांच्या वडिलोपार्जीत राधाकृष्ण वॉर्ड, भिमनगर गोंदिया येथील घरातून ७ हजार २०० रूपयाचे साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी ३ मे रोजी अटक केली आहे. तौसीक ऊर्फ पिरु मुस्ताक शेख (२०) व पंकज ऊर्फ नायडु दिलीप यादव (२६) दोन्ही रा. राधाकृष्ण वाॅर्ड, भिमनगर, गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ मे ते २ जून या दरम्यान अमोलकुमार गजभिये यांच्या राधाकृष्ण वार्ड, भिमनगर येथील घरातून घरफोडी करुन चांदीचे सिक्के व इतर मुद्देमाल चोरी केला. गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेतला. दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला ७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बानकर, गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ कदम, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, महिला पोलीस हवालदार रिना चोव्हाण, पोलीस शिपाई दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने यांनी केली आहे.