पीएमजेएसवायमध्ये गोंदिया आठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:08 PM2019-07-29T22:08:05+5:302019-07-29T22:08:19+5:30

गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा घेताना पैशाची अडचण भासू नये, त्यांच्यावर संपूर्ण उपचार व्हावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी गोंदिया जिल्ह्याने टॉप टेनमध्ये आपले नाव कोरले असून राज्यात आठव्या क्रमांकावर जिल्हा आहे.

Gondia VIII in PMJSY | पीएमजेएसवायमध्ये गोंदिया आठवा

पीएमजेएसवायमध्ये गोंदिया आठवा

Next
ठळक मुद्दे४१९७४ गोल्डन कार्ड तयार : पहिल्या क्रमांकावर येण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा घेताना पैशाची अडचण भासू नये, त्यांच्यावर संपूर्ण उपचार व्हावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी गोंदिया जिल्ह्याने टॉप टेनमध्ये आपले नाव कोरले असून राज्यात आठव्या क्रमांकावर जिल्हा आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात २३ डिसेंबर २०१८ ला करण्यात आली. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणना दारिद्र रेषेखालील असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. हलाकीच्या परिस्थितीमुळे गंभीर आजारावर उपचार करू न शकणाऱ्या रूग्णांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येतो.
सन २०११ च्या जनगणनेच्या आधारावर गोंदिया जिल्ह्यातील ६ लाख ७५ हजार ११७ लोकांना या योजनेचा फायदा देणे अपेक्षीत आहे. यापैकी २५ जुलैपर्यंत ४१ हजार ९७४ जणांचे कार्ड तयार करण्यात आले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ९७१ व नविन ३२९ आजार समाविष्ट करून अश्या १३०० आजारांवर या योजनेंतर्गत उपचार करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पाच लाख रूपयापर्यंतचा उपचार रूग्णांना देण्यात येत आहे.
रूग्णांना प्रवास भत्ता देण्यात येते. ज्या कुटुंबाना प्रधानमंत्री यांच्याकडून पत्र पाठविण्यात आले त्यांनी आपले गोल्डन कार्ड शासकीय रूग्णालयात केटीएस, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातून मोफत तयार करू शकता.
खासगी रूग्णालय बाहेकर व न्यू गोंदिया हॉस्पीटलमध्ये ही मोफत सेवा देणार आहे. १६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Gondia VIII in PMJSY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.