गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:36 PM2019-09-09T23:36:31+5:302019-09-09T23:37:34+5:30

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Gondia, villages in Tiroda taluka surround flood | गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

googlenewsNext
ठळक मुद्देवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ : आठ मार्ग बंद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लागली कामाला

पिकांचे नुकसान
वैनगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतामध्ये साचल्याने रोवणी वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी रात्रीपासून हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
१३ वर्षांनंतर प्रथमच पूर परिस्थिती
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गावकऱ्यांमध्ये रोष
तिरोडा तालुक्यातील नदी काठालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीचे पाणी साचले आहे. मात्र याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी कुठलाच संपर्क न केल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
धापेवाडा येथे घरांमध्ये साचले पाणी
तिरोडा तालुक्यातील धापेवाडा हे गाव वैनगंगा नदीच्या तीरावर वसले असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या गावातील काही घरांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे.तर काही ठिकाणी घरांची सुध्दा पडझड झाली आहे.
धरणाचे दरवाजे केले बंद
सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला, कालीसराड धरणाचे दरवाजे रविवारी उघडण्यात आले होते.त्यामुळे काही मार्ग बंद झाले होते.मात्र सोमवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. इटियाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
१०६ सहा नागरिकांना हलविले
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील ढिवरीटोली गावात पाणी शिरले.यामुळे येथील गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटीच्या मदतीने बाहेर काढले. तसेच तिरोडा तालुक्यातील किडंगीपार येथील १०६ नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांना गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी आश्रम शाळेत ठेवण्यात आले.
चार मजुरांना काढले सुखरुप बाहेर
सोमवारी वैनगंगा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील किन्ही येथील रेतीघाटावर काम करीत असलेले चार मजूर अडकले होते. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले.यात दिलीपसिंह मोहनसिंह गौर, संदीप यादव, रुहमसिंग सैनी, सुनिलसिंग या चार जणांचा समावेश आहे.

Web Title: Gondia, villages in Tiroda taluka surround flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर