Gondia: मंडई बघायला गेले, माय-लेकास बेदम मारले
By कपिल केकत | Updated: November 16, 2023 16:15 IST2023-11-16T16:14:53+5:302023-11-16T16:15:04+5:30
Gondia News: नातीची तब्येत बरी नसतानाही गावातील मंडई बघण्यासाठी गेले या कारणावरून पत्नी व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गंगाझरी येथे बुधवारी (दि.१५) दुपारी १:३० वाजेदरम्यान घडली.

Gondia: मंडई बघायला गेले, माय-लेकास बेदम मारले
- कपिल केकत
गोंदिया - नातीची तब्येत बरी नसतानाही गावातील मंडई बघण्यासाठी गेले या कारणावरून पत्नी व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गंगाझरी येथे बुधवारी (दि.१५) दुपारी १:३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादी छाया मंगल दमाहे (४८, रा.गंगाझरी) व त्यांचा मुलगा पंकज हे दोघे गावातील मंडई बघण्यासाठी गेले होते.
मंडई बघून घरी पतरल्यावर मात्र आरोपी मंगल दादू दमाहे (५०, रा. गंगाझरी) याने नातीची तब्येत बरी नसूनही मंडई बघण्यासाठी गेले या कारणातून छाया यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्याने तोंडावर मारले. यामध्ये त्यांच्या तोंडाला जखम होऊन एक दात तुटला. तर, पंकज याला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याच्या हातावर किरकोळ मार लागला. पोलिसांनी छाया दमाहे यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३२५, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.