गोंदियाकर दिवसाला ८ मोबाइल हरवितात (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:58+5:302021-02-14T04:26:58+5:30
गोंदिया : आजघडीला मोबाइल ही अत्यावश्यक बाब झाली आहे; परंतु मोबाइल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात ...
गोंदिया : आजघडीला मोबाइल ही अत्यावश्यक बाब झाली आहे; परंतु मोबाइल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कागदपत्राच्या होत असलेल्या कटकटीमुळे अनेक लोक तर तक्रार करायलाच पुढे येत नाहीत. जे लोक पुढे येतात, त्यांची संख्या पाहता दिवसाकाठी ८ लोकांचे मोबाइल हरविले जातात किंवा चोरी होतात. त्यामुळे प्रत्येकाने मोबाइल सांभाळण्याची गरज आहे.
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. या आठ तालुक्यात १६ पोलीस ठाणे असून, या पोलीस ठाण्याचा आढावा घेतल्यास मोबाइल चोरी किंवा मोबाइल हरविण्याचे प्रमाण खूप मोठे आहे; परंतु दररोज कमीत कमी आठ मोबाइल गायब होत असल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबाइल हरवित किंवा चोरीला जात आहेत; परंतु अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मोबाइल खरेदी केल्यावर महिने-दोन महिने मोबाइलचे बिल सांभाळून ठेवले जाते; परंतु अधिक वेळ झाल्यावर नवीन मोबाइलचे बिलही सांभाळले जात नाही. अशा स्थितीत मोबाइल चोरीला गेला किंवा हरविला तर मोबाइलचे बिल आणल्याशिवाय पोलीस तक्रारच घेत नाही. त्यामुळे अनेक लोक मोबाइल चोरीला गेले तरी तक्रार करायला पुढे येत नाहीत.
बॉक्स
२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी
जानेवारी-१३
फेब्रुवारी-११
मार्च -१४
एप्रिल- २
मे-२
जून -३
जुलै-४
ऑगस्ट -६
सप्टेंबर-८
ऑक्टोबर-१०
नोव्हेंबर-१३
डिसेंबर- १५
बॉक्स
गर्दीत जाताय मोबाइल सांभाळा
आपण लग्न समारंभात, उत्सव, मेळाव्यात, मेला किंवा बाजारात जात असाल तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा. कारण गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. अनेकांना मोबाइलची भुरळ पडल्याने हातात पैसे नसल्याने दुसऱ्याचे मोबाइल पळविण्याचा सपाटा सुरू आहे. प्रत्येकाने आपला मोबाइल सांभाळून गर्दीत प्रवेश करावा. गर्दीचा फायदा घेत आपला मोबाइल चोरीला जाऊ नये किंवा गर्दीत धक्काबुक्कीत आपला मोबाइल खाली पडू नये, याची खबरदारी घ्यावी.
बॉक्स
हरविले शेकडो, मिळाले २६
गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीला जात आहेत; परंतु सालेकसातील एक मोबाइल दुकान चोरीची घटना वगळल्यासही शेकडो मोबाइल चोरीला जात आहेत. एकट्या गोंदिया शहरातून ८ मोबाइल चोरीला जात आहेत. गोंदिया शहरात मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. घरात चार्जींगला लावलेले मोबाइल चोरी करणाऱ्या डोंगरगड येथील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी चोरलेले मोबाइल रेल्वे परिसरात खड्डा खोदून त्यात ते मोबाइल गाडून ठेवले होते. असे २६ मोबाइल त्या महिलांकडून जप्त करण्यात आले आहेत.
कोट
मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना अटक करून त्यांच्या जवळून २६ मोबाइल जप्त केले होते. त्या महिलांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या जवळून काही मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाइल चोरांवर आमची करडी नजर आहे.
-महेश बन्सोडे पोलीस निरीक्षक गोंदिया.