गोंदियाच्या हर्षने तयार केली लुनापासून बाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:15 AM2018-01-09T11:15:21+5:302018-01-09T11:15:45+5:30

आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.

Gondia's Harsh made bike from luna | गोंदियाच्या हर्षने तयार केली लुनापासून बाईक

गोंदियाच्या हर्षने तयार केली लुनापासून बाईक

Next
ठळक मुद्देतंत्र प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.
हर्षला लहानपणापासूनच विज्ञान विषयात रुची आहे. सध्या तो आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात (एमसीव्हीसीला) बाराव्या वर्गात शिकत आहे. गोंदिया येथील शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात एम.सी.व्ही.सी. व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता संयुक्तपणे तंत्र प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रकांत निनाळे, सहायक संचालक मेहंदळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे अधिकारी घुले यांनी प्रदर्शनाला उपस्थित राहून प्रतिकृतींची पाहणी करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते.
हर्षने जुन्या लुनापासून तयार केलेल्या मॉडिफाईड बाईकला प्रथम क्रमांक देऊन त्याचा सत्कार केला.

Web Title: Gondia's Harsh made bike from luna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.