अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 11:40 AM2022-06-24T11:40:30+5:302022-06-24T11:44:58+5:30
गुरुवारी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई / गोंदिया :गोंदिया येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. मूळचे भाजपचे कार्यकर्ते असलेले अग्रवाल हे अलीकडेपर्यंत शिवसेनेचे सदस्य होते. तथापि, गुरुवारी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
गोंदियाचे अपक्ष आमदार श्री. विनोद अग्रवाल जी यांनी आज मा. देवेंद्र जी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. अग्रवालजी यांचे स्वागत आणि अभिनंदन. pic.twitter.com/SpNOhr00SY
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 23, 2022
टाइमलाइन
- सकाळी १०.३० - शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहटी येथील रेडिसन ब्लू येथे दाखल
- सकाळी ११.०० - शिंदे गटातील आमदार वास्तव्यास असणाऱ्या हॉटेल रेडिसन ब्लू येथे तृणमूल काँग्रेसचे आंदोलन
- सकाळी ११.३० - एकनाथ शिंदे यांची कायदेतज्ज्ञांची ऑनलाइन चर्चा
- दुपारी १२.०० - राष्ट्रवादीच्या नेते मंडळीची सिल्व्हर ओकवर बैठक सुरू
- दुपारी १२.१५ - विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची पत्रकार परिषद; अजय चौधरीच गटनेते असल्याचे स्पष्टीकरण
- दुपारी १.०० - शिवसेनेचे सर्व ३७ आमदार आणि नऊ अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन
- दुपारी १.१५ - मातोश्री बंगल्यावर शिवसेना नेते आणि कायकर्ते जमायला सुरुवात
- दुपारी १२.०० - आमदार संजय शिरसाट यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
- दुपारी १.१५ - शिवसेनेचे सर्व आमदार, नेते मंडळी आणि पदाधिकारी वर्षा बंगल्यावर पोहोचण्यास सुरुवात
- दुपारी २.३० वाजता - शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू; बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचे केले आवाहन.
- संध्याकाळी ४.०० - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक.
- संध्याकाळी ५.०० - काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू.
- संध्याकाळी ६.१५ - काँग्रेसची बैठक संपली, नाना पटोले यांनी जाहीर केली भूमिका.
- संध्याकाळी ६.३० - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना.
- संध्याकाळी ६.४५ - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका
- संध्याकाळी ७.०० - मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक
- संध्याकाळी ७.०० - गुवाहाटी येथील हॉटेलात एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केले मार्गदर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल
- संध्याकाळी ७.४५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू