गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:48 PM2017-10-30T22:48:39+5:302017-10-30T22:48:53+5:30
यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री राजकुमार बडोले व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, यंदा जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकºयांनी सिंचनाअभावी पेरणीच केली नाही. त्यातच कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला असून किडींच्या प्रादुर्भावामुळे ते धानपिकही शेतकºयांच्या हातून जाण्याच्या मार्गावर आहे. यातच अवकाळी पावसाने हातात असलेल्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पुढील हंगामाच्या चिंतेत जिल्ह्यातील शेतकरी आहे. याशिवाय यंदा सरासरीत ५५ टक्केच पाऊस पडल्याने नैसर्गिक जलस्त्रोतात जलसाठा अत्यल्प आहे. अशावेळी भविष्यातील नियोजनाकरिता शासनाने वेळीच दखल घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत व सेवा पुरविण्यात यावी.