जिल्ह्याची खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर; ९१५ गावांची पैसेवारी ९५ पैसे  

By अंकुश गुंडावार | Published: September 28, 2023 05:23 PM2023-09-28T17:23:21+5:302023-09-28T17:23:29+5:30

जिल्ह्यातील ४ गावांची पैसेवारी ही ५० पैशाच्या खाली आहे.

gondiya District's Kharif season money list announced; 95 paise for 915 villages |  जिल्ह्याची खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर; ९१५ गावांची पैसेवारी ९५ पैसे  

 जिल्ह्याची खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर; ९१५ गावांची पैसेवारी ९५ पैसे  

googlenewsNext

गोंदिया : महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार, पैसेवारीच्या अनुपातानुसार, जमीन महसुल तहकूब, कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणून, शासनाचा महसूल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. यालाच आणेवारी असा शब्द प्रचलित होता.आज २८ सप्टेबंरला गोंदिया जिल्हा प्रशासनाने काढलेल्या पैसेवारीनुसार गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी ही ०.९५ पैसे एवढी काढण्यात आली आहे.

यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांची पैसेवारी ही ५० पैशाच्या खाली आहे. तर पिक नसलेल्या ३६गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आलेली नाही. तर ९१५ गावांची पैसेवारी ही ५० पैशाच्यावर आहे. गोंदिया तालुक्यातील १५३ गावापैकी १४९ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर आहे.तालुक्याची पैसेवारी ९५ पैसे निघाली आहे.गोरेगाव तालुक्यातील ९९ गावापैकी ९४ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर आहे.तालुक्याची पैसेवारी ९६ पैसे निघाली आहे.तिरोडा तालुक्यातील १२५ गावापैकी १२३ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर आहे.तालुक्याची पैसेवारी ८७ पैसे निघाली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १५९ गावापैंकी १४८ गावांची पैसेवारी ५० पैसाच्यावर असून तालुक्याची आणेवारी ९१ पैसे आहे.देवरी तालुक्यातील १३५ गावांपैकी १२८ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर असून तालुक्याची पैसेवारी १.०८ पैसे आहे. आमगाव तालुक्यातील ८३ गावापैकी ८३ गावे ५० पैसाच्या वर असून तालुक्याची आणेवारी ९५ पैसे आहे.सालेकसा तालुक्यातील ९२ गावांपैकी ८६ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर असून तालुक्याची पैसेवारी ९० पैसे आहे.तर सडक अर्जुनी तालुक्यातील १०९ गावापैकी १०४ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या वर असून तालुक्याची पैसेवारी ९९ पैसे असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी विभागीय आय़ुक्त यांच्याकडे सादर केला आहे.
 

Web Title: gondiya District's Kharif season money list announced; 95 paise for 915 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.