गोंदिया सामान्य तर तिरोडा सामान्य महिला
By admin | Published: October 6, 2016 12:53 AM2016-10-06T00:53:20+5:302016-10-06T00:53:20+5:30
नगरपरिषदच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज बुधवारी जाहीर झाले. यात गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी तर तिरोडा नगर परिषदेचे
गोंदिया : नगरपरिषदच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज बुधवारी जाहीर झाले. यात गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी तर तिरोडा नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावर आपण अध्यक्ष व्हावे यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
सर्वांच्या नजरा लागून असलेली नगर परिषद अध्यक्षपदाची सोडत अखेर आज बुधवारी (दि.५) काढण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने रविवारी (दि.२) परिपत्रक काढले. प्रभागाच्या आरक्षणाची उत्सूकता बऱ्याच दिवसापासून होती. नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आरक्षण कळल्यानंतरच इच्छूक तयारीला लागले आहेत.आज बुधवारी (दि.५) नगर परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला. नगर विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयाच्या परिषद सभागृहात सोडत काढण्यात आली आहे. यासाठी सहायक संचालक, संबंधीत जिल्हा प्रशासन अधिकारी, संबंधीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक यांंना सूचित करण्यात आले होते. विशेष म्हणजे महसूल विभागातील १० लोकप्रतिनीधी सोडतीसाठी उपस्थित होते. गोंदिया मध्ये अध्यक्षपदासाठी चूरश आहे. अध्यक्षपदी आरूढ होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटी सुरू केल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)