नकाशाच्या बाहेर कधी पडेल गोंदियातील कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:26 AM2017-07-23T00:26:55+5:302017-07-23T00:26:55+5:30

जिल्हा निर्मितीला १८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते.

Gondiya Jail will be outside the map | नकाशाच्या बाहेर कधी पडेल गोंदियातील कारागृह

नकाशाच्या बाहेर कधी पडेल गोंदियातील कारागृह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा निर्मितीला १८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय व मनुष्यबळालाही त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने गोंदियाला वर्ग दोनचे कारागृह मंजूर केले. मात्र दोन वर्षापासून नकाशे तयार झाले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकच तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा अधिक गुन्हे घडतात. वर्षाकाठी १२५ ते १५० च्या जवळपास आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ लागतो. त्यातच वाहन व्यवस्था केली जाते. त्यात लागणारे इंधन ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन गोंदिया कारागृह तयार करणे गरजेचे आहे. गोंदियातील आरोपीना भंडारा येथे नेत असताना कुणी आरोपी पसार झाला. किंवा त्याने वाहनातून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर या प्रकारामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कारवाईस सामोरे जावे लागते. आरोपीं पळून गेल्यामुळे काही पोलीस शिपायांवर निलंबिनाची कारवाई झाली. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी गोंदियात कारागृह तयार करणे गरजेचे होते. शासनाने सन २०११-१२ मध्ये गोंदियात वर्ग एक चे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाकडून झाल्या. परंतु अधिक्षक बदलून गेले व वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव तसाच अद्यापही प्रलबिंत आहे. भंडारा जिल्हा कारागृह अधिक्षक म्हणून अनुपकुमार कुंभरे नोव्हेंबर २०१५ मध्ये रूजू झाले. त्यानंतर मंत्रालयातील नगररचना कार्यालयाने गोंदियात वर्ग दोन चे कारागृह तयार करण्याची मंजूरी देत त्यासाठी जागा पाहण्याचा आदेश काढला. त्यानुसार कारागृह भंडाराच्या अधिक्षकांनी जागेची पाहणी केली. गोंदियाच्या पोलिस मुख्यालयामागील जागेवर कारागृह तयार करण्याचे ठरले. वर्ग एकच्या कारागृह बांधकामासाठी ५५ कोटी रूपये लागणार असल्याचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. परंतु गोंदिया लहान असल्याने वर्ग दोनचे कारागृह तयार करण्याचे नंतर ठरले. वर्ग २ च्या कारागृहाला ३५ कोटी रूपये अंदाजे लागणार आहेत. त्या संबधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाकडे मागच्या वर्षी पाठविण्यात आला. परंतु, अद्यापही नकाशे तयार न झाल्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही.

कारागृहासाठी २० एकर जागा
पोलीस मुख्यालयाच्या मागील भागात ८.७५ हेक्टरमध्ये म्हणजेच २० एकर जमिनीत कारागृह तयार होणार आहे. यातील ४ हेक्टर जमीन शासनाची असून उर्वरीत जमीन शेतकऱ्यांची आहे. शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
३०० आरोपींची क्षमता
गोंदियातील आरोपींना या कारागृह ठेवण्यात येणार आहे. या तरूंगात २५० ते ३०० कैदी ठेवण्याची क्षमता असणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना भंडाराच्या कारागृह नेण्याचा पोलिसांचा त्रास कायम आहे.

जागेची पाहणी करण्यात आली असून २० एकरात हे कारागृह तयार करण्यात येणार आहे. बांधकामाचे अंदाजपत्रक, नकाशे बांधकाम विभागाकडे आहे. खर्चाचा आढावा शासनाकडे लवकरच पाठविला जाणार आहे. नकाशे तयार न झाल्याने अंदाजपत्रक तयार झाले नाही. काम अंतीम टप्यात आले.- अनुपकुमार कुंभरे अधीक्षक कारागृह भंडारा.
 

Web Title: Gondiya Jail will be outside the map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.