गोंदियातील दारू ‘बंदी’च्या जिल्ह्यांत!

By admin | Published: August 24, 2016 12:04 AM2016-08-24T00:04:44+5:302016-08-24T00:04:44+5:30

गोंदियातून एका स्कॉर्पिओ वाहनाद्वारे दारूबंदी असलेल्या गडचिरोली-चंद्रपूरकडे जाणारी ३५ पेट्या दारू अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी ईटखेडा नावाजवळ पकडली.

Gondiya liquor bars' districts! | गोंदियातील दारू ‘बंदी’च्या जिल्ह्यांत!

गोंदियातील दारू ‘बंदी’च्या जिल्ह्यांत!

Next

३५ पेट्या पकडल्या : अर्जुनी पोलिसांची सतर्कता
इसापूर : गोंदियातून एका स्कॉर्पिओ वाहनाद्वारे दारूबंदी असलेल्या गडचिरोली-चंद्रपूरकडे जाणारी ३५ पेट्या दारू अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी ईटखेडा नावाजवळ पकडली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ईटखेडाजवळ करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, ३५ पेट्या गोवा स्पेशल व्हिस्की (किंमत १ लाख ७ हजार ५२० रुपये) एका महिंद्रा स्कार्पिओ (एमएच ३५/एम-१४९) मधून वडसाकडे जात होती. पोलिसांनी हे वाहन शिताफीने पकडले. वाहनासह एकूण ५ लाख ७ हजार ५२० रुपयांचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला. यात आरोपी महेंद्रसिंग उपेंद्रसिंग ठाकुर (२४) व प्रसन्न संजय कुचूलकर (१९) दोन्ही रा. वाजपेयी वार्ड, श्रीनगर गोंदिया यांना अटक करण्यात आली.
पो.शि. घनशाम मुळे यांच्या फिर्यादीवरून सदरची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तपास अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक संदीप पाटील पो.हवालदार फलेंद्र गिरी, नापोशि थेर, मुकेश थेर, नरेंद्र फुलबांधे, पो.शि.घनश्याम मुळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Gondiya liquor bars' districts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.