गोंदियाचे मार्केट होणार केबलमुक्त

By Admin | Published: February 24, 2016 01:38 AM2016-02-24T01:38:39+5:302016-02-24T01:38:39+5:30

व्यापार नगरी गोंदियाच्या मार्केट परिसरात सध्या विद्युत खांबांवर तारांचा चांगला गुंता वाढलेला आहे.

Gondiya market will be free of cable | गोंदियाचे मार्केट होणार केबलमुक्त

गोंदियाचे मार्केट होणार केबलमुक्त

googlenewsNext

उच्च व लघुदाब दोन प्रकार : पुढील आर्थिक वर्षात होणार टेंडर प्रक्रिया
कपिल केकत गोंदिया
व्यापार नगरी गोंदियाच्या मार्केट परिसरात सध्या विद्युत खांबांवर तारांचा चांगला गुंता वाढलेला आहे. यातून शॉर्ट सर्किट होऊन दुकाने भस्मसात होण्याच्या घटनाही अनेक वेळा घडत आहेत. मात्र यातून आता कायमटी सुटका होणार असून त्यासाठी गोंदियाच्या संपूर्ण मार्केट परिसरात भूमिगत (अंडरग्राऊंड) केबल टाकण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. एप्रिल महिन्यात याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
वीज चोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासोबतच आगीसारखे अपघाट टाळण्यासाठी आता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरियर बंच) केबलच्या माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत (आय.पी.डी.एस.) हे काम होणार जाणार असून यात उच्चदाब व लघुदाब असे दोन प्रकारचे केबल टाकले जाणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून वीज चोरी पकडण्यासाठी किंवा थकबाकीची वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय मनुष्यबळाची कमतरता यामुळे दैनंदिन कामात महावितरण मागे पडत आहे. वीज चोरीच्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासोबतच उघड्यावर वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमुळे अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने आता वेगळीच शक्कल लढविली आहे.
ज्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकता येणार नाही, अशा भागांत एबी केबलच्या (एरियर बंच) माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. येथून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात गोंदियासाठी १८ कोटी ३८ लाख रूपयांची तर तिरोडासाठी नऊ कोटी ८२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी दिली. या योजनेंतर्गत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र निविदा प्रक्रिया मुख्य कार्यालयाकडून (मुंबई) केली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत निविद्रा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन वर्षांच्या आत हे काम करावयाचे आहे.
अंडरग्राऊंड केबलमध्ये जमिनीच्या आतून केबल टाकले जाणार आहे. जेणेकरून आकडा घालण्याचा प्रकार बंद होऊन कुणालाही वीज चोरी करता येणार नाही. तसेच एबी केबल म्हणजे हे विशिष्ट प्रकारचे केबल आहे. या केबलच्या आतमध्ये वीज पुरवठा करणारे तार राहणार असून त्यावर कोटींग राहणार आहे. म्हणजेच जीवंत वीज तार केबलच्या आत राहिल्याने त्यावर आकडा घालता येणार नाही.

उच्चदाब व लघुदाब वाहिनी टाकणार
या योजनेंतर्गत उच्चदाब वाहिनीसाठी गोंदिया शहरात चार किमी तर तिरोडा शहरात तीन किमीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जागेची निवड करण्यात आलेली नाही. लघुदाब वाहिनीसाठी अंडरग्राऊंडअंतर्गत गोंदियात १० किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. तिरोडा शहरात लघुदाब वाहिनी सध्यातरी टाकली जाणार नाही. जेथे शक्य होणार नाही अशा भागांत एरीयर बंच केबल टाकले जाणार आहे. यासाठी गोंदियात १४ किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय या योजनेंतर्गत गोंदिया शहरात दोन नवे सबस्टेशन तयार केले जाणार आहेत.

Web Title: Gondiya market will be free of cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.