विदर्भात गोंदियात सर्वात कमी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:13 AM2017-11-29T10:13:44+5:302017-11-29T11:24:07+5:30
विदर्भात मंगळवारीे १०.२ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली.
ठळक मुद्देमागील दहा वर्षातले सर्वाधिक कमी तापमानशीत लहरींचा प्रभाव
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : विदर्भात मंगळवारीे १०.२ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली. मागील दहा वर्षातील हे सर्वात कमी तापमान असून यापूर्वी २९ नोव्हेबर १९९८ ला ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशाकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे शहरातील तापमानात घट होत आहे. पुढीेल दोनतीन दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता आहे.