गोंदिया-तिरोड्याचे मागासलेपण दूर करणार
By Admin | Published: January 7, 2017 01:54 AM2017-01-07T01:54:43+5:302017-01-07T01:54:43+5:30
नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कचरा व सांडपाण्यावर खत व विद्युत प्रक्रिया करणार
गोंदिया/तिरोडा : नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही. आम्हाला फक्त अडीच वर्षे संधी मिळाली. पुढील काही वर्षे सत्ता दिल्यास गोंदिया व तिरोडा शहराचे मागासलेपण पूर्णपणे दूर करून विकासाच्या वाटेवर आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी गोंदिया व तिरोडा येथे झालेल्या सभेत दिली.
आज शहरात प्रदूषण, रोगराई, बेकारी वाढत असताना नरेंद्र मोंदीनी आपले शहर चांगले करण्यासाठी शहराचा विकास करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. खेड्यातून नागरिक शहरात आले आहे. हे वास्तव स्विकारुन प्रत्येकाला घर, स्वच्छ पाणी, रोजगार आरोग्य मिळाले पाहिजे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील ३०० शहर दिड वर्षात हागणदारी मुक्त करण्यात आली आहेत. आपल्या शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भाजप-सेना उमेदवाराला निवडून दया. केंद्रात व राज्यात आमचेच सरकार आहे. कोणतेही प्रस्ताव निश्चित मंजूर करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरोडा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्यावेळी उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर बोलून दाखविले.
पुढे ते म्हणाले कचरा व सांडपाणी यावर प्रक्रिया करुन कचऱ्यापासून खत तर सांडपाणीवर प्रक्रिया करुन विजनिर्मिती प्रकल्प उभारून नगर परिषदेला पैसा मिळवून देता येईल.खत शेतकऱ्याला स्वत: देता येईल. २०१९ पर्यंत ज्यांना घर नाही त्या सर्वांना घर देण्यात येईल. ही केंद्राची योजना असून महाराष्ट्र शासन त्यात अधिकचा एक लाखाना निधीही देणार असल्याचे सांगितले. उज्जवला योजना, नोटबंदीचा फायदा कसा झाला त्यामुळे नक्षलवादी, आतंकवादी, काळे-पैेसवाले पाकीस्थान असे अडचणीत आले याचाही खरपूस समाचार घेऊन येत्या निवडणुकीत भाजप-सेना युतीच्या उमेदवारांना निवडून दया तिडोड्याच्या विकास करण्यास आ. विजय रहांगडाले, खा. नाना पटोले व मी स्वत: कटिबद्ध आहे असे यावेळी आवाहन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, खासदार नाना पटोले यांनीही तिरोडा येथील स्थानिक सम्यांचा खरपूस समाचार घेतला. सिंचनात धापेवाडा टप्पा-१, व टप्पा-२, नगर परिषदेने ४ पट टॅक्स वाढविण्याचा ठाराव, यावर भर देऊन बंद घडीला सत्ता दिल्यावर कशी फळे भोगावी लागतात ते ही यावेळी स्पष्ट करुन सांगितले.