गोंदियात तणाव कायम

By admin | Published: June 16, 2015 12:49 AM2015-06-16T00:49:00+5:302015-06-16T00:49:00+5:30

सुदर्शन समाजाचे आणि न.प.मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेता छेदीलाल इमलाह यांच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या...

Gondiya tension remains permanent | गोंदियात तणाव कायम

गोंदियात तणाव कायम

Next

बाजारपेठेवर परिणाम : दुपारनंतर दुकाने पुन्हा झाली बंद
गोंदिया : सुदर्शन समाजाचे आणि न.प.मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेता छेदीलाल इमलाह यांच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या हत्येनंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती सोमवारीसुद्धा कायम होती. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम कायम होता.
सकाळपासूनच दहशतीचे वातावरण कायम असल्यामुळे ९५ टक्के दुकानदारांनी दुकाने उघडण्याची हिंमत केली नाही. काही मोजकीच दुकाने उघडल्या गेली. दुपारी वातावरण निवळल्याचे समजून बऱ्याच दुकानदारांनी दुकाने उघडली. मात्र मात्र वातावरण ठिक नसल्यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकलेच नाही. दरम्यान सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा काही युवकांनी मार्केट परिसरात आरडाओरड करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक यादव बंधूंना अटक केल्याचीही अफवा काही लोकांनी पसरविली. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. शहराच्या अनेक भागात सोमवारीही दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. मात्र जनजीवन सामान्य करण्यात पोलीस प्रशासनाला अजून यश आलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

अफवांमुळे दहशत
गोंदिया शहरात आणखी एक हत्या झाल्याची अफवा सकाळपासून पसरविली जात होती. त्यामुळे गोंदिया शहरातील बाजारपेठेत सकाळपासून अनेक दुकाने उघडलीच नाही. काही व्यापाऱ्यांनी अर्धवट दुकाने उघडली. दुपारी माहौल शांत झाल्याचे वाटल्याने बहुतांश दुकाने उघडली. मात्र सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा यादव बंधूंना अटक झाल्याची अफवा पसरवित काही युवकांनी मार्केट परिसरात हुल्लडबाजी केली. त्यामुळे पुन्हा सर्व दुकाने पटापट बंद करण्यात आली.

Web Title: Gondiya tension remains permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.