परप्रांतातील ट्रकांचा गोंदियात व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:11 AM2017-05-28T00:11:23+5:302017-05-28T00:11:23+5:30

परप्रांतातून गोंदियात येणारे ट्रक विना अनुज्ञप्तीने मालाची वाहतूक अनेक दिवसापासून करीत आहेत.

The Gondiya trade of the surrounding trucks | परप्रांतातील ट्रकांचा गोंदियात व्यवसाय

परप्रांतातील ट्रकांचा गोंदियात व्यवसाय

Next

पायबंद घाला : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परप्रांतातून गोंदियात येणारे ट्रक विना अनुज्ञप्तीने मालाची वाहतूक अनेक दिवसापासून करीत आहेत. परप्रांतातील ट्रक स्थानिक मालाची वाहतूक करीत असल्याने या ट्रकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्रक चालक-पालक संघटनेने केली आहे.
परप्रांतातून येणारे ट्रक गोंदियातील स्थानिक माल वाहून नेत आहेत. त्याच्यावर कलम दोन अंतर्गत चालान करून वाहन मालकाचे आधार कार्ड तपासण्यात यावे. छत्तीसगड, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्याचे ट्रक येत असल्यास चालकाचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र पाहुनच कारवाई करावी. छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या तिन्ही राज्याचे ट्रक देवरी, सौंदड व गोंदिया डेपोमधून माल वाहतूक करीत आहेत. परप्रांतातील परमीट असताना गोंदियात वाहतूक होत आहेत. ट्रकच्या व्यवसायातही मोठी स्पर्धा असल्याने ट्रक चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याकडे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने लक्ष देण्याची मागणी ट्रक चालक-मालक संघटनेचे हेमराज मुनिश्वर, मनोहर खानोरकर, जोगेंद्र वैरागडे, राजु बोधानी, राजकुमार चन्नेकर, राजकुमार हरिणखेडे, महेश सोनवाने, राजेश बुडेकर, अरविंद कापसे व इतरांनी केली आहे.

Web Title: The Gondiya trade of the surrounding trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.