गोंदियात झाली चेहऱ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:14 PM2018-06-27T22:14:59+5:302018-06-27T22:15:50+5:30
अपघातात चेहºयावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहºयाची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने ही शस्त्रक्रिया गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातच करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अपघातात चेहऱ्यावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहऱ्यांची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने ही शस्त्रक्रिया गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातच करण्यात आली. गोरेगाव तालुक्यातील एका व्यक्तीचा गंभीर अपघात झाल्याने त्याच्या तोंडाची हाडे मोठ्या प्रमाणात तुटलेली होती. त्या रूग्णाला शस्त्रक्रियेसाठी नागपूरला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.चेहऱ्याची शस्त्रक्रिया यापूर्वी गोंदियात कधीच झाली नव्हती. परंतु महात्मा जोेतिबा फुले जन आरोग्य योजनेतून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्या रूग्णांच्या चेहऱ्यावर दुर्र्मिळ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गोंदियात मागील दीड वर्षापासून रुजू झालेले ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांनी गंभीर रूग्णांना हाताळणे सुरू केले. सोमवारी (दि.२५) रोजी सकाळी १० ते १२.३० या अडीच तास त्या रूग्णाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रूग्णाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तुटलेल्या हाडांना इंजेक्शन लावण्यासाठी बधिरीकरण तज्ज्ञांची भुमिका महत्वाची असते. भूलतजज्ञ डॉ. सुगंध व डॉ. हेमंत देशमुख यांनी या शस्त्रक्रियेसाठी यांनी महत्वाची भुमिका बजावून सहकार्य केले. यापूर्वी अशा रूग्णांना नागपूरलाच रेफर केले जात होते. परंतु डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने आता गोंदियातच या रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. वैद्यकीय अधिष्ठाता पी.व्ही.रूखमोडे यांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मदत
चेहऱ्यावर दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मदत देण्यात आली. केटीएस मधील आरोग्य मित्र डॉ. स्मीता भरणे यांच्या प्रयत्नाने या रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया गोंदियातच पहिल्यांदा करण्यात आली.