सर्वांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:15 AM2017-12-17T00:15:54+5:302017-12-17T00:16:30+5:30
आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. त्यामुळे सर्वांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचावी असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रत्यनाने गोंदिया जिल्हा राज्यातील असा जिल्हा ठरला आहे जेथे नवे आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थापीत झाले असल्याचे सांगीतले. पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्व सामान्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढणे हेच लोकप्रतिनिधींचे काम आहे. यामुळेच आमदार अग्रवाल यांना जनतेने नेहमीच आर्शिवाद दिला असे मत व्यक्त केले.
शिबिरात शासकीय मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पातूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, शेखर पटेल, स्नेहा गौतम, चमन बिसेन, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनील मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, प्रमिला करचाल, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, लक्ष्मी रहांगडाले व अन्य उपस्थित होते.