चांगली सुरूवात म्हणजे विचारपूर्वक निर्णय

By admin | Published: February 25, 2016 01:36 AM2016-02-25T01:36:50+5:302016-02-25T01:36:50+5:30

यश संपादनासाठी नियोजन आवश्यक आहे. नियोजन हा कार्याचा आत्मा आहे. नियोजन करणे एवढेच महत्वाचे नसून त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Good start is a thoughtful decision | चांगली सुरूवात म्हणजे विचारपूर्वक निर्णय

चांगली सुरूवात म्हणजे विचारपूर्वक निर्णय

Next

साकोली : यश संपादनासाठी नियोजन आवश्यक आहे. नियोजन हा कार्याचा आत्मा आहे. नियोजन करणे एवढेच महत्वाचे नसून त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्व विद्यार्थी अभ्यासात मग्न व तल्लीन झालेले आहेत. चांगली सुरूवात म्हणजे विचारपूर्वक निर्णय होय असे प्रतिपादन विद्या कटकवार यांनी स्थानिय कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात आयोजित १० वी, १२ वी कला व विज्ञान विभागाच्या मुलांना वर्ग ९ व ११ च्या विद्यार्थीकडून आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून १० वी चे वर्गशिक्षक शिवदास लांजेवार, हिवराज येरणे, निलिमा गेडाम, उत्तम गायधने, अशोक गायधने, राजेश भालेराव, संजय पारधी, प्राचार्य प्रकाश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप समारंभाची सुरूवात करण्यात आली. १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग ५ वी पासूनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयातील शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर, राहणीमानावर मनापासून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे भाषणे, मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचालन ९ वी चे विद्यार्थी यश भुरले, यश चन्ने यांनी केल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Good start is a thoughtful decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.