‘गुडमॉर्निंग’ पथक वर्षभरात झाले ‘गुडनाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:12 PM2019-01-22T22:12:02+5:302019-01-22T22:12:25+5:30

गावागावातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. मात्र पथकाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने अवघ्या एका वर्षातच ‘गुडनाईट’ व्हावे लागले आहे. जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आलेला मोहिमेनंतर गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागल्याने ही मोहीम गुंडाळण्यात आली आहे.

'Goodnight' team takes place in 'Goodnight' | ‘गुडमॉर्निंग’ पथक वर्षभरात झाले ‘गुडनाईट’

‘गुडमॉर्निंग’ पथक वर्षभरात झाले ‘गुडनाईट’

Next
ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावर : नागरिकांचे उदासीन धोरण

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गावागावातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. मात्र पथकाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने अवघ्या एका वर्षातच ‘गुडनाईट’ व्हावे लागले आहे. जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आलेला मोहिमेनंतर गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागल्याने ही मोहीम गुंडाळण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत असल्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर ‘गुडमॉर्निंग’ पथकांचे गठन केले होते. या ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी होईल असे वाटत असतांनाच गावकºयांनी ‘गुडमार्निंग’ पथकाला जोरकस विरोध करीत त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकरी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. काही तालुक्यांमध्ये शौचास जाणाºयाला गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याची गांधीगिरी देखील करण्यात आली. ग्रामस्थांच्या चांगला सवयीसाठी स्थापन झालेल्या या पथकाला मात्र विरोध झाला आणि अनेक आरोपही लागल्याने ही मोहीम थांबल्याचे चित्र आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात स्वच्छता नांदावी, उघड्यावरील शौचास आळा बसावा या उद्देशातून ‘गूडमॉर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली होती. पण या पथकाला लोकसहभाग न मिळाल्यामुळे हे अभियान एकाच वर्षात गुंडाळण्यात आले.
‘गुडमॉर्निंग’ पथकावरच कारवाई
उघड्यावर जाणीवपूर्वक प्रात:विधी करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व कलम ११७ मधील दंडात्मक तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत होती. गावातील उपद्रवी नागरिकांवर आळा बसावा गावागावात स्वच्छता टिकावी हा यामागचा उद्देश होता. मात्र ‘गूडमॉर्निंंग’ पथकाने उघड्यावर प्रात:विधी करणाऱ्या नागरिकांचे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे बºयाच तालुक्यात ‘गूडमॉर्निंंग’ पथकालाच कारवाईला पुढे जावे लागले.
अनेकांकडे शौचालयच नाही
गावागावात अनेकांकडे शौचालय नसल्याचे वास्तव चित्र आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत १२०० रुपयांत शौचालयाचे बांधकाम करण्यासंदर्भात शासनाने अनुदान दिले होते. त्या १२०० रुपयांत अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले. पण सुविधा नसल्यामुळे त्या शौचालयांचा वापर होऊ शकला नाही, पुढे प्रशासनाने शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान दिले. पण प्रथम १२०० रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना पुढे लाभ देता येणार नाही. शासनाच्या या अटी-शर्तींमुळे स्वच्छ भारत मिशन फक्त कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शौचालय आणि पाणी समस्या
गावागावात तयार करण्यात अलेले सार्वजनिक शौचालय व त्याजवळील पाण्याची उपलब्धता याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे शौचालयांचा वापर करणे नागरिकांनी टाळले. शौचालयातील घाण, तुटलेले दार यामुळे शौचालयांचा वापर करावा कसा या प्रमुख समस्या नागरिकांना उघड्यावर प्रात: विधी करण्यास बाध्य करीत होत्या.

Web Title: 'Goodnight' team takes place in 'Goodnight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.