गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशावरुन वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:27+5:30

मंगळवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉनमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच या वेळी उपस्थित गोंदिया ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ. अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला.

Gopal Das Agarwal's atmosphere was heated by the BJP entrance | गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशावरुन वातावरण तापले

गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशावरुन वातावरण तापले

Next
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांनी केले शक्तिप्रदर्शन : दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राजीनामे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काँग्रेसचे आ. गोपालदास अग्रवाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोरदार पेव फुटले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन वातावरण तापले आहे.आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाचा विरोध करण्यासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले.या वेळी दोन हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे सादर करीत आ.अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारी देत असाल तर आमचे राजीनामे मंजूर का अशी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपमधील वातावरण तापले आहे.
मागील आठवड्यात खमारी येथे झालेल्या एका भूमिपूजन कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांना आता सांभाळून घ्या असे पालकमंत्री परिणय फुके यांना सांगितले होते. तेव्हापासूनच आ.अग्रवाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आले होते.त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे.काहीही झाले तरी आ.अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये,अन्यथा आम्ही आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली. मंगळवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी,बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे सभा घेतली. या सभेला जवळपास तीन हजारावर कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या सभेला भाजपचे एकही वरिष्ठ नेते अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते. सर्व कार्यकर्त्यांनी प्रथमच एकत्रीत येऊन आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाचा तीव्र विरोध केला. या वेळी भाजप महामंत्री,बुथ सदस्य आणि जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.तसेच अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारी दिल्यास आमचे राजीनामे मंजूर करा,अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजप पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे.अशा शब्दात रोष व्यक्त केला. या वेळी भाजपचे हजारो महिला पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष
मंगळवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉनमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच या वेळी उपस्थित गोंदिया ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ. अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील खदखद या निमित्ताने पुढे आली. याप्रकरणी भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

कुणीही चालेल आ.अग्रवाल नको
जलाराम लॉन येथे आयोजित सभेत केवळ आ.गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाचा विषयच चर्चेचा मुद्दा होता. भाजपने आ.अग्रवाल वगळता कुणालाही उमेदवारी दिली चालेल. मात्र आ.अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सर्वजण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे देऊ अशी भूमिका घेतली.

Web Title: Gopal Das Agarwal's atmosphere was heated by the BJP entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.