गोवारी समाजाची गोवर्धन पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:14 AM2017-10-23T00:14:34+5:302017-10-23T00:15:00+5:30
येथील गोवारी समाज संघटनेच्यावतीने गोवर्धन पूजेचा कार्यक्रम बाजार चौकातील श्रीकृष्ण मंदिरामध्ये घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : येथील गोवारी समाज संघटनेच्यावतीने गोवर्धन पूजेचा कार्यक्रम बाजार चौकातील श्रीकृष्ण मंदिरामध्ये घेण्यात आला.
गायगोधनाचे औचित्य साधून गोवारी समाजबांधवाच्यावतीने श्रीकृष्ण मंदिरामध्ये काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तुळसीदास बोरकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राधेशाम झोळे, दे.मो. मानकर, डॉ. कुंदन कुलसुंगे, रत्नाकर बोरकर, शामकांत नेवारे, प्रमोद पाऊलझगडे, मोरेश्वर सावकार बनपूरकर, कुकसू मेश्राम, उपसरपंच वैशाली मानकर, साधू मेश्राम, नित्यानंद पालीवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना गोवारी समाज संघटनेकडून पान सुपारी वितरित करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच परिसरात वेळोवेळी समाजापयोगी उपक्रम राबवून गरजवंताच्या मदतीसाठी धावून जाणारे डॉ. कुलसुंगे यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून गावातील समाज घटकातील गरीब गरजू दाम्पत्यांस वस्त्रदान करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक कार्यात सदोदित पुढाकार घेणारे डॉ. कुलसुंगे आपल्या विधायक कार्याने सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
यावर्षी गोवारी समाजातील प्रल्हाद राऊत व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यास कुर्ता, धोतर, साडी, चोळी, ब्लँकेट तसेच दिवाळीच्या फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. प्रास्ताविक दे.मो. मानकर यांनी मांडले. आभार सुभाष मानकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.पी.डी. राऊत, दुर्गा काळसर्पे, कैलास मानकर, दामोधर मानकर, कार्तिक मानकर आदींनी सहकार्य केले.