नागरिकांच्या सेवेसाठीच शासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:50 AM2017-07-21T01:50:13+5:302017-07-21T01:50:13+5:30
सामान्य माणूस अगोदरच विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यात अधिकारी त्यांना कामासाठी चकरा मारायला लावतात.
गोपालदास अग्रवाल : ग्राम आसोली येथील जनता दरबार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामान्य माणूस अगोदरच विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यात अधिकारी त्यांना कामासाठी चकरा मारायला लावतात. मात्र सर्व सामान्यांना सेवा देताना अधिकाऱ्यांनी सचेत रहावे. कारण नागरीक शासनासाठी नसून शासन नागरिकांच्या सेवेसाठी असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचातय समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होत्या.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना कामासाठी जनतेला फिरविण्याचे प्रकार बंद करून नागरिकांची कामे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश दिले. तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषी पंपांसाठी प्राथमिकतेने व्यवस्था क रण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे व पंचायत समिती सभापती हरिणखेडे यांनीही, नागरिकांच्या समस्यांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ओमप्रकाश भक्तवर्ती, शेखर पटेल, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, सयाराम भेलावे, जोसीराम भेलावे, लोकचंद धुर्वे, दुलीचंद धुर्वे, विठ्ठल करंडे, चैतन्य बहेकार, सूरजलाल महारवाडे, डॉ. शिवशंकर हेमणे, विजय पटले, नामदेव वैद्य, बंडू हेमणे, कैलाश सुरसाऊत, अशोक गणवीर व अन्य उपस्थित होते.