पाच जिल्ह्यातील शासकीय धान भरडाईला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:42+5:302021-03-26T04:28:42+5:30

गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा आतापर्यंत या पाचही जिल्ह्यांत ...

Government breaks again in five districts | पाच जिल्ह्यातील शासकीय धान भरडाईला पुन्हा ब्रेक

पाच जिल्ह्यातील शासकीय धान भरडाईला पुन्हा ब्रेक

Next

गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा आतापर्यंत या पाचही जिल्ह्यांत १ कोटी लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे, पण या धानाची उचल करून भरडाई करणे राईस मिलर्सने मागील दीड महिन्यापासून थांबविले आहे. त्यामुळे हा धान तसाच उघड्यावर पडला असून, याची लवकर उचल न झाल्यास लाखो क्विंटल धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करते. त्यानंतर राईस मिलर्स भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा करतात. मात्र यंदा धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची गुणवत्ता योग्य नसल्याने भरडाईनंतर धानाची उतारी कमी येत असून तुकडा होण्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. त्यामुळे राईस मिलर्सला प्रति क्विंटल मागे ३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यातील राईस मिलर्सने धानाची उचल करुन भरडाई करणे थांबविले आहे. राईस मिलर्सला प्रति क्विंटल धानापासून ६७ किलो तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो, तर २५ टक्केपर्यंत तुकडा हा स्वीकारला जातो. मात्र सध्या १ क्विंटल तांदूळ भरडाई केल्यानंतर त्यापासून ६३ किलो तांदूळ होत असून, तुकड्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. शिवाय धानाची गुणवत्ता सुद्धा याेग्य नसल्याने प्रति क्विंटलमागे राईस मिलर्सला ३०० रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होत असून, भरडाई केलेला तांदूळ सुद्धा स्वीकारण्यास एफसीआय नकार देत आहे. त्यामुळेच धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प आहे.

......

धानाचे अपग्रेड करण्याची मागणी

धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने तांदळाची उतारी कमी येत आहे. त्यामुळे धानाचे अपग्रेड करून प्रति क्विंटल ३०० रुपये राईस मिलर्सला देण्यात यावे, तांदळातील तुकड्याचे प्रमाण २५ टक्केवरून ४० टक्के करण्यात यावे, अशी मागणी राईस मिलर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे. पण दीड महिन्यांपासून यावर तोडगा न निघाल्याने राईस मिलर्सने धानाची उचल करून भरडाई करणे बंद केले असल्याचे राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

.............

२०१०-१३ मध्ये निर्माण झाली होती हीच समस्या

यंदासारखीच परिस्थिती २०१० ते २०१३ या कालावधीत निर्माण झाली होती. पण तेव्हा सुद्धा शासनाने यावर तीन वर्षे तोडगा न काढल्याने खरेदी केलेला ३० लाख क्विंटल धान सडला होता. यामुळे शासनाचे ३९४ काेटी रुपयांचे नुकसान झाले होते, तर यंदा सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच जिल्ह्यात खरेदी केलेला एक कोटी क्विंटल धान उघड्यावर पडला असून, मे महिन्यापूर्वी या धानाची उचल केल्यास हा धान खराब होण्याची शक्यता आहे.

.........

टेस्ट मिलिंगची मागणी

शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा खरेदी करण्यात आलेल्या धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने त्याचा परिणाम भरडाईवर हाेत आहे. त्यामुळे आठही तालुक्यातील केंद्रावरील धानाची टेस्ट मिलिंग करून तांदळाचा पडता काढण्यात यावा, अशी मागणी राईस मिलर्सकडून केली जात आहे.

Web Title: Government breaks again in five districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.