सरकारला कुणाचीही चिंता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:00 AM2018-09-12T00:00:29+5:302018-09-12T00:01:27+5:30
पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते. मात्र आज या सरकारला कुणाचीही चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम अंभोरा येथील वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील अंतर्गत रस्ते तसेच ग्राम वडेगाव येथील नदी घाट रस्ता, बुद्ध विहार चावडी तसेच वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नाली बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कोणत्याही क्षेत्रात विकास कामांना खेचून आणणे हे जनप्रतिनिधींच्या सजगतेवर निर्भर करते. आज राज्यात भाजप सरकार असूनही आम्ही प्रयत्न करून गोंदिय विधानसभा क्षेत्रात विकास कामे खेचून आणत आहोत. मात्र सरकारला कुणाशीही काही घेणे-देणे नाही. यामुळेच पिकविमाच्या नावावर सरकारने शुल्क वसूल करूनही दुष्काळात शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ सरकार देऊ शकली नाही. यामुळेच या वर्षापासून पिकांच्या आनेवारीचे आकलन ग्रामस्तरावर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणार असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांच्या अध्यक्षतेत आयोजीत कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, श्यामकला पाचे, राजेश माने, योगीता पाचे, नरसू पाचे, सुरेश पाचे, रूखमीनी पाचे, मुलचंद सिंगनधुपे, अनुसया पाचे, मिताराम ठाकरे, शिवलाल जभरे, विमला देशकर, रूपेलाल पाचे, हेमराज देशकर, आमेश पाचे, फिरतलाल कावरे, बालुराम पाचे, छेदीलाल पाचे, लक्ष्मीचंद पाचे, प्रकाश डहाट, वाय.पी.रहांगडाले, चिंतामन चौधरी, राजेश रामटेके यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.