जीवनमूल्ये जपण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:11 PM2018-01-10T23:11:56+5:302018-01-10T23:12:10+5:30

राज्यात शेतकरी, मजूर आणि बेरोजगाराची समस्या भेडसावित आहे. मात्र याकडे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण राज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये जपण्यास सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.

 Government fails to maintain livelihoods | जीवनमूल्ये जपण्यात सरकार अपयशी

जीवनमूल्ये जपण्यात सरकार अपयशी

Next
ठळक मुद्देसहषराम कोरेटे : कालीमाटी येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
कालीमाटी : राज्यात शेतकरी, मजूर आणि बेरोजगाराची समस्या भेडसावित आहे. मात्र याकडे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण राज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये जपण्यास सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
पीएचसी ग्राऊंड येथे आयोजित ‘जय जवान जय किसान’ नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र नायडू, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सुरेश हर्षे, सरपंच गजानन भूते, तालुका काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. संजय डोये, महामंत्री गणेश हुकरे, अशोक ब्राम्हणकर, ग्रामीण बँकेचे लेखापाल रमेश शेंडे, मनोज शेंडे, बापू भांडारकर, राधेलाल कटरे, अमृतलाल गौतम, ग्यानीराम डोये, अतुल चौव्हाण, पोलीस पाटील भास्कर पटले, तंमुसचे अध्यक्ष शालीक गिºहेपुंजे, करण उमरबनिया, ग्रा. पं. सदस्य यवकराम फुंडे, शामकला शेंडे, सुनिता शेंडे, निर्मला मारबदे, डॉ. चंदन पिंपळकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अ‍ॅड.एच.डी.बागडे, टेकरीचे तंमुस अध्यक्ष डोमेश्वर सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच सुशिल भांडारकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार राजीव फुंडे तर आभार मनोज सिंदीमेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास तुरकर, अरविंद पाथोडे, भोजराज गिºहेपुंजे, गणेश कुकडीबुरे, विजय हरिणखेडे, राजू उके, प्रल्हाद झाडे, प्रशांत बहेकार, माणीक करंडे, कृष्णा चुटे, राजेश गिºहेपुंजे, घनश्याम करंडे, मंगेश फुंडे, हेमंत शेंडे, तेजराम बहेकार, सुखदेव फुंडे, हिरालाल करंडे, विजय सिंधीमेश्राम, संजू मोटघरे, अनिल मेंढे, सुशील पाथोडे, देवराज शेंडे, महेंद्र कुसराम, सुशिल गायधने, किशोर बहेकार, आशिष बहेकार, दिलीप उके, दिलीप बंसोड यांनी सहकार्य केले.

Web Title:  Government fails to maintain livelihoods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.